Nova Flip S: स्टाइल आणि टेक्नॉलॉजीचं अनोखं कॉम्बिनेशन! Huawei च्या नव्या फोल्डेबल फोनचा लूक पाहून नजरा हटणार नाहीत
Huawei Nova Flip S चीनमध्ये लाँच केला आहे. हा एक फोल्डेबल स्मार्टफोन असून या स्मार्टफोनमध्ये 2024 मध्ये लाँच करण्यात आलेल्या Nova Flip मॉडेलसारखे काही स्पेसिफिकेशन्स दिले आहेत. मात्र हा स्मार्टफोन स्वस्त आहे आणि तो दोन रंगात खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीने लाँच केलेल्या या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 4,400mAh बॅटरी, 50 मेगापिक्सेलचा डुअल रियर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर देण्यात आला आहे.
Huawei Nova Flip S हा स्मार्टफोन 256GB आणि 512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,388 म्हणजेच सुमारे 41,900 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,688 म्हणजेच सुमारे 45,600 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन न्यू ग्रीन, झिरो व्हाइट, सकुरा पिंक, स्टार ब्लॅक, स्काय ब्लू आणि फेदर सँड ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Huawei Nova Flip S मध्ये 6.94 इंचाचा फुल-HD+ (2690×1136 पिक्सेल) OLED फोल्डेबल इंटरनल स्क्रीन आणि 2.14 इंच चा OLED कवर डिस्प्ले आहे, दोन्ही राउंड कॉर्नर डिझाईनसह येतात. आउटर स्क्रीनमध्ये 480×480 पिक्सेल रेजॉल्यूशन आहे. मुख्य स्क्रीन P3 वाइड कलर गैमटला सपोर्ट करते आणि यामध्ये 120Hz LTPO एडाप्टिव रिफ्रेश रेट, 1440Hz हाई-फ्रिक्वेंसी PWM डिमिंग आणि 300Hz टच सँपलिंग रेट देण्यात आले आहे, ज्यामुळे डिस्प्ले आणखी स्मूद आणि रिस्पॉन्सिव बनतो.
Huawei ने आतापर्यंत Nova Flip S च्या चिपसेट किंवा रॅमबाबत माहिती दिली नाही. मात्र रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये Kirin 8000 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, जो स्टँडर्ड Nova Flip मॉडलमध्ये मिळू शकतो. हा फोन 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शनसह लाँच करण्यात आला आहे आणि हा स्मार्टफोन HarmonyOS 5.1 वर आधारित आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायंच झालं तर Huawei Nova Flip S मध्ये f/1.9 अपर्चरसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. कंपनीचे म्हणणे आहे की शूटिंग मोडनुसार फोटोची गुणवत्ता बदलू शकते. आतील स्क्रीनमध्ये f/2.2 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
Huawei Nova Flip S मध्ये 4,400mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 66W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अनफोल्ड झाल्यानंतर 6.88mm जाड असतो आणि त्याचे वजन 195 ग्रॅम असते. सुरक्षिततेसाठी, यात बाजूला बसवलेला फिंगरप्रिंट सेन्सर आहे जो जलद आणि विश्वासार्ह ऑथेंटिकेशन प्रदान करतो.