माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. नागपूरमधील बोगस मतदार याद्यांच्या चौकशीवर बोलताना त्यांनी सांगितले की, या चौकशीनंतर “दूध का दूध आणि पाणी का पाणी” होईल. सत्य समोर आल्यावर कोण खरे आणि कोण खोटे हे स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणावर आमचे विरोधक फेक नरेटिव्ह तयार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुनील तटकरे नवजीवन विद्या मंदिराच्या नव्या इमारतीच्या नामकरण सोहळ्यानिमित्त आले असता माध्यमांशी बोलत होते.