स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. स्मार्टफोनचा वापर केल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होत नाही. स्मार्टफोनवर आपण सोशल मीडियापासून कॉलिंगपर्यंत सर्व काम करतो. पण काहीवेळा आपल्या स्मार्टफोनची स्क्रीन खराब होते. ही स्क्रीन रिप्लेस केल्यानंतर स्मार्टफोनची काळजी कशी घ्यायची याबाबत अनेकांना माहिती नसतं. आता आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: स्क्रीन रिप्लेसमेंटनंतर अशी घ्या तुमच्या स्मार्टफोनची काळजी, नाहीतर होईल मोठं नुकसान
फोन स्क्रीन बदलल्यानंतर व्यवस्थित काळजी न घेतल्यास ओरखडे, क्रॅक किंवा इतर नुकसानमुळे स्क्रीन पुन्हा खराब होऊ शकते.
फोनच्या स्क्रीनला ओरखड्यांपासून वाचवण्यासाठी स्क्रीन प्रोटेक्टरचा वापर करा.
स्मार्टफोनच्या स्क्रीनला सुरक्षित ठेवण्यासाठी टेम्पर्ड ग्लास हा एक स्वस्त आणि टिकाऊ पर्याय आहे.
स्मार्टफोनच्या स्क्रीनचे आणि संपूर्ण स्मार्टफोनची सुरक्षा करण्यासाठी फोन कव्हर वापरा.
ओलावा किंवा जास्त उष्णता फोनच्या स्क्रीनला आणि इतर अंतर्गत घटकांना नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे तुमचा फोन अशा ठिकाणी ठेवणं टाळा.