Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्री-फ्री-फ्री! 90 हजारांचे अ‍ॅपल वॉच मोफत खरेदी करण्याची संधी, फक्त पूर्ण करावी लागणार ही अट

अ‍ॅपल वॉच खरेदी करायची आहे का? मग थांबा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला 90 हजारांचे अ‍ॅपल वॉच मोफत खरेदी करण्याची संधी मिळणरा आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही अटी शर्तींचं पालन करावं लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 04, 2024 | 01:00 PM
फ्री-फ्री-फ्री! 90 हजारांचे अ‍ॅपल वॉच मोफत खरेदी करण्याची संधी, फक्त पूर्ण करावी लागणार ही अट

फ्री-फ्री-फ्री! 90 हजारांचे अ‍ॅपल वॉच मोफत खरेदी करण्याची संधी, फक्त पूर्ण करावी लागणार ही अट

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी अ‍ॅपल आणि त्यांचे प्रोडक्ट युजर्समध्ये लोकप्रिय आहे. पण या सर्व प्रोडक्टची किंमत देखील प्रचंड आहे. त्यामुळे अनेकांना हे प्रोडक्ट खरेदी करणं शक्य नसतं. पण जर अ‍ॅपलचे प्रोडक्ट मोफत ऑफर केली जात असतील तर? ऐकूण आश्चर्य वाटलं ना, पण होय हे खरं आहे. तुम्हाला 90 हजारांचे अ‍ॅपल वॉच मोफत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरने गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. आता या ऑफरची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

अ‍ॅपल वॉच फ्री-फ्री-फ्री!

गेल्या काही दिवसांपासून एक्स आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका धुमाकूळ घातला आहे. “अ‍ॅपल वॉच फ्री-फ्री-फ्री!” हे ऐकून लोक खूश झाले आहेत. पोस्टनुसार, Apple Watch SE, Apple Watch Ultra 2, आणि नवीनतम Apple Watch 10 सारखी प्रीमियम मॉडेल्स मोफत उपलब्ध आहेत. पण हे वॉच घेण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी अट पूर्ण करावी लागणार आहे. ही अट म्हणजे तुम्हाला दिवसाला 15,000 पावले चालावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मोफत अ‍ॅपल वॉचचे सत्य काय आहे?

ऑफर खरोखर समजून घेण्यासाठी, तुम्ही आयफोन युजर असणे आवश्यक आहे, कारण Apple Watch फक्त iPhones सोबत जोडते. अँड्रॉईड वापरकर्त्यांना या ऑफरमधून वगळण्यात आले आहे. तुम्हाला या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी अ‍ॅपल वॉच खरेदी कारवं लागणार आहे. यानंतरच ही ऑफर लागू केली जाईल.

अ‍ॅपल वॉच खरेदी करणे आवश्यक: प्रथम तुम्हाला 24,900 रुपयांपासून ते 89,900 रुपयांपर्यंतचे अ‍ॅपल वॉच खरेदी करावे लागेल. ऑफरमध्ये EMI चा पर्याय दिलेला नाही, त्यामुळे एकरकमी पेमेंट करावे लागेल.

HDFC ॲपवर नोंदणी करा: घड्याळ खरेदी केल्यानंतर, तुम्हाला HDFC Ergo Zopper ॲप डाउनलोड करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचे केवायसी पूर्ण करावे लागेल, ज्यामध्ये पॅन कार्ड आणि बँक तपशील प्रदान करणे समाविष्ट आहे. इथे तुम्ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ऑफरसाठी रजिस्टर करू शकता.

विनामूल्य घड्याळ, परंतु कठोर अटी

  • या ऑफर अंतर्गत, तुम्हाला दररोज 15,000 पावले (सुमारे 12 किलोमीटर) चालावे लागेल. दररोज 15,000 पावले चालण्यासाठी तुम्हाला ॲपमध्ये 4 पॉईंट्स मिळतील.
  • जर तुम्ही महिन्यातून 30 दिवस सतत 15,000 पावले चालत असाल तर तुम्हाला 120 पॉइंट मिळतील, म्हणजे 7,491 रुपये मिळणार आहे. म्हणजेच एका पॉईंटसाठी तुम्हाला 62 रुपये मिळणार आहेत.
  • ही ऑफर वर्षभर चालेल. याचा अर्थ, तुम्हाला एक वर्ष सतत 15,000 पावले दररोज चालावे लागतील.
  • जर तुम्ही कोणत्याही दिवशी कमी पावले चालत असाल तर त्यानुसार पैसे कापले जातील.
  • अशा प्रकारे दर महिन्याला तुम्हाला 7,491 रुपये मिळतील आणि वर्षाच्या शेवटी तुम्हाला 89,892 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच तुम्ही खरेदी केलेल्या स्मार्टवॉचचे पैसे वसूल होणार आहेत.

फिटनेसही महत्त्वाचा

अ‍ॅपल वॉचचे तंत्रज्ञान: या ऑफरचा सर्वात मनोरंजक पैलू म्हणजे अ‍ॅपल वॉचचे तंत्रज्ञान तुमच्या पावले आणि हृदयाच्या गतीचे बारकाईने निरीक्षण करते. काही अनियमितता आढळल्यास ती त्वरित पकडली जाईल.

हेल्थ चेकअप: या आव्हानात उडी मारण्याआधी, तुमचे आरोग्य त्याला साथ देण्यासाठी परिपूर्ण असल्याची खात्री करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अ‍ॅपलसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अटी आणि शर्ती: जर तुम्ही दररोज 12 किलोमीटर चालायला तयार असाल तर ही ऑफर आकर्षक असू शकते. परंतु तुम्ही एचडीएफसी एर्गो ॲपवर लॉग इन करताच, अटी आणि शर्ती असलेला ईमेल काळजीपूर्वक वाचा.

फिटनेस आणि मेहनत: ही ऑफर म्हणजे फिटनेस आणि मेहनत यांचा उत्तम मेळ आहे, पण ते गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे. शेवटी काहीही मोफत मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.

Web Title: Tech news how to get your money back of apple watch know terms and conditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 01:00 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट… असं राहा सुरक्षित
1

Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट… असं राहा सुरक्षित

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल
2

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही
3

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी
4

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.