ChatGPT ला मागे टाकणारा DeepSeek फोनमध्ये इंस्टॉल करायचाय? पटापट फॉलो करा या सोप्या Steps
चायनीज AI मॉडेल DeepSeek सध्या प्रचंड चर्चेत आहे. DeepSeek ने अमेरिकेत मोठे यश मिळवले आहे. चीनच्या नवीन AI मॉडेल DeepSeek ने टेक मार्केटसह संपूर्ण जगात खळबळ उडवली आहे. चीनच्या DeepSeek AI ने ChatGPT सारख्या AI चॅटबॉट दिग्गजांना अडचणीत आणले आहे. सोमवारी अनेक एआय आधारित अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
चीनच्या DeepSeek ने ChatGPT ला टाकलं मागे, अमेरिकेच्या अॅप स्टोअरवर मारली बाजी
ChatGPT ची मूळ कंपनी OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी अलीकडेच DeepSeek ची लोकप्रियता आणि वाढ यावर भाष्य केले, DeepSeek चे R1 हे एक प्रभावी मॉडेल आहे. आम्ही नक्कीच खूप चांगले मॉडेल्स सादर करू आणि नवीन स्पर्धक मिळणे खरोखरच रोमांचक आहे, असं OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी सांगितलं होतं. (फोटो सौजन्य –DeepSeek)
DeepSeek AI ने त्याच्या प्रगत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने जगभरातील तंत्रज्ञान तज्ञ आणि AI डेव्हलपर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या मॉडेलने App Store वर OpenAI च्या ChatGPT ला मागे टाकले आहे. DeepSeek R1 वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी विनामूल्य वापरला जाऊ शकतो. त्यामुळे आता अनेकजण आपल्या स्मार्टफोनमध्ये आणि वेबवर DeepSeek चा कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो, याबद्दल सर्च करत आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून स्मार्टफोनमध्ये आणि वेबवर DeepSeek चा वापर करू शकता.
DeepSeek चे वैशिष्ट्ये हे त्याचे ओपन-सोर्स स्वरूप आहे, ज्यामुळे ते रिसर्च आणि कस्टमाइजेशनसाठी एक आदर्श प्लॅटफॉर्म बनते. तुम्ही DeepSeek तुमच्या संगणकावर किंवा मोबाईलवर सहज वापरू शकता. तुम्ही लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवर कशा प्रकारे DeepSeek चा वापर करू शकता याबद्दल जाणून घेऊया.
तुम्ही DeepSeek इंस्टॉल करण्यापूर्वी, तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची खात्री करावी लागणार आहे. DeepSeek प्रचंड डेटा प्रोसेसिंगचा वापर करते, त्यामुळे तुम्हाला उच्च-कार्यक्षमता मशीनची आवश्यकता असेल.
मॅक वापरकर्ते थेट ओलामा वेबसाइटवरून इंस्टॉलर डाउनलोड करू शकतात. तुम्ही होमब्रूशी परिचित असल्यास, ही आज्ञा वापरा: brew install ollama
टीप: नवीन नोंदणी सध्या होल्डवर आहेत. वेबसाइटवर लिहिले आहे: ‘मोठ्या संख्येने मॅलिशियस अटॅक्स झाल्यामुळे रजिस्ट्रेशनमध्ये अडचणी येत आहे. कृपया प्रतीक्षा करा.
तुमच्या iPhone मध्ये आधीच TikTok इंस्टॉल आहे? थांबा डिलीट करू नका, मिळवा लाखो रुपये कमवण्याची संधी