तुमच्या iPhone मध्ये आधीच TikTok इंस्टॉल आहे? थांबा डिलीट करू नका, मिळवा लाखो रुपये कमवण्याची संधी
सध्या अमेरिकेत टिकटॉकवरून मोठा वादविवाद सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पद स्विकारल्यानंतर टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. Oracle आणि Microsoft मध्ये TikTok चे ग्लोबल ऑपरेशन्स ताब्यात घेण्यासाठी बोलणी सुरू आहेत. ओरॅकल TikTok खरेदी करण्याचा विचार करत आहे. ओरॅकल टिकटॉकच्या अल्गोरिदम, डेटा सराव आणि सॉफ्टवेअर अपडेट यासारख्या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष ठेवेल, अशी माहिती आहे.
Google Maps वर दिसतय रहस्यमयी HELP साइन, काय आहे या प्रकरणाचं गूढ? जाणून घ्या
2020 मध्ये मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल आणि वॉलमार्ट यांनी मिळून टिकटॉक विकत घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी याला “poisoned chalice’ म्हटले. टिकटॉकने अद्याप ट्रम्प यांच्या अलीकडील टिप्पण्यांना प्रतिसाद दिलेला नाही, परंतु अलीकडेच दावा केला आहे की ते एलोन मस्क किंवा इतर कोणत्याही युनिट्सला विक्री करण्याचा विचार करत नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता टिकटॉकबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता असं सांगितलं जात आहे की, अमेरिकेतील ज्या iPhones मध्ये आधीच TikTok इंस्टॉल आहे त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे आयफोन तब्बल लाखो रुपयांना विकले जात आहेत. यूएस मधील टिकटॉकच्या तात्पुरत्या बंदीने एक अनोखी बाजारपेठ निर्माण केली आहे, जिथे टिकटॉक ॲप प्री-इंस्टॉल केलेले iPhone हजारो डॉलर्समध्ये विकले जात आहेत.
USA Today च्या अहवालानुसार, Apple आणि Google ॲप स्टोअर्समधून टिकटॉक तात्पुरते काढून टाकल्यानंतर अनेक आयफोन वापरकर्ते या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. TikTok प्री-इंस्टॉल केलेल्या iPhones च्या सूची eBay वर पाहता येतील. काही विक्रेते या फोनसाठी $25,000 पर्यंत म्हणजेच अंदाजे 21.6 लाख रुपये एवढी मोठी किंमत ऑफर करत आहेत.
Airtel, Jio की Vi कोणत्या कंपनीचे नवीन रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त? जाणून घ्या सविस्तर
ॲप स्टोअरमधून TikTok काढून टाकल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे आधीच TikTok इन्स्टॉल केलेले आयफोन वापरकर्ते वापरू शकतात, परंतु ज्यांनी ते डिलीट केले आहे किंवा ते कधीही इन्स्टॉल नाही आहेत ते आता डाउनलोड करू शकत नाहीत. यामुळे, TikTok प्री-इंस्टॉल केलेल्या फोनची मागणी वाढली आहे.
eBay वरील सूचीमध्ये किमतींची विस्तृत श्रेणी पाहिली जाऊ शकते. या आयफोनसाठी काहीजण शेकडो डॉलर्सची मागणी करत आहे. उदाहरणार्थ, फ्लोरिडातील एका विक्रेत्याने $10,000 म्हणजेच अंदाजे 8.62 लाख रुपयांना iPhone 15 Pro Max ला सूचीबद्ध केले आहे. त्याचप्रमाणे, नॉर्थ कॅरोलिनातील एका वापरकर्त्याने iPhone 16 Pro Max हा $25,000 म्हणजेच अंदाजे 21.6 लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या प्रकरणात, iPhone 15 Pro ला TikTok आणि ByteDance च्या व्हिडिओ-एडिटिंग ॲप CapCut सह $4.5 दशलक्ष म्हणजेच अंदाजे 38.81 कोटी रुपयांना सूचीबद्ध केले गेले.
हे फोन खरंच इतक्या मोठ्या किमतीत विकले जात आहेत की नाही हे स्पष्ट झालेले नाही. जे फोन विकले जाण्याच्या जवळपास दिसत आहेत ते सहसा जुने मॉडेल असतात आणि त्यांची किंमत $100 ते $200 म्हणजेच अंदाजे 8,600 ते 17,200 रुपयांदरम्यान आहे.