Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadhaar-Ration Link: घरबसल्या रेशनकार्डशी आधार करा लिंक, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केल्याने तुम्हाला रेशन सहज मिळू शकेल. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुमचं आधार कार्ड रेशन कार्डसोबत लिंक करू शकता. यासाठी एक सोपी प्रोसेस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 28, 2025 | 09:39 AM
Aadhaar-Ration Link: घरबसल्या रेशनकार्डशी आधार करा लिंक, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Aadhaar-Ration Link: घरबसल्या रेशनकार्डशी आधार करा लिंक, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:

तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही अजून आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार, तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करणं गरेजचं आहे. कारण तुम्ही रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक केल नाही तर तुम्हाला रेशन कार्डवर धान्य मिळणार नाही. जर तुम्ही देखील अद्याप आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आपण घरी बसल्या बसल्या रेशन कार्डशी आधार लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

चीनच्या DeepSeek ने ChatGPT ला टाकलं मागे, अमेरिकेच्या अ‍ॅप स्टोअरवर मारली बाजी

रेशन कार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक

शासनाकडून रेशन दिले जाते मात्र काही भामटे बनावट शिधापत्रिकेद्वारे मोफत रेशनच्या सुविधेचा फायदा घेतात. यामुळे सामान्य लोकांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळत नाही. त्यामुळे आता याच सर्व घटना लक्षात घेऊन सरकारने एक आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये सांगितलं आहे की, प्रत्येक रेशन धारकांनी त्यांच्या आधार कार्डसोबत रेशन कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. जर आधार रेशन कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात. रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी, तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत PDS वेबसाइटवर जावे लागेल. (फोटो सौजन्य – Pinterest) 

रेशन सहज मिळेल, योजनेचा लाभ मिळेल

रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केल्याने तुम्हाला रेशन सहज मिळू शकेल. तसेच, रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केल्याने बनावट रेशन रोखण्यात मदत होईल. याशिवाय, स्वस्त रेशनसाठी खरोखर पात्र असलेले लोकच या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. तुम्हाला घरबसल्या आधार कार्ड रेशन कार्डसोबत कसं लिंक करता येईल, यासाठी एक सोपी प्रोसेस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुमचं आधार कार्ड रेशन कार्डसोबत लिंक करू शकता.

आधार आणि रेशन कार्ड ऑनलाइन कसे लिंक करावे?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर राज्य सरकारची अधिकृत PDS वेबसाइट ओपन करा.
  • लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  • आधार लिंकिंग विभागात जा आणि आधार-रेशन कार्ड लिंक पर्याय निवडा.
  • यानंतर रेशनकार्ड क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर तपशील फील करा.
  • तपशील प्रविष्ट केल्यानंतर, व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP (वन टाइम पासवर्ड) पाठवला जाईल.
  • आता तुमच्या समोर दिसणाऱ्या स्क्रिनवर OTP टाका.
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर एक कन्फर्मेशन मेसेज येईल, ज्यामध्ये सांगितलं असेल की तुमचं रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात आहे.

Samsung नवीन Tri-Fold स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

आधार आणि रेशन कार्ड ऑफलाइन कसे लिंक करावे?

  • आधार आणि रेशन कार्ड ऑफलाइन लिंक करण्यासाठी तुम्हाला सर्व आवश्यक डॉक्यूमेंटसोबत तुमच्या जवळील सायबर केंद्रात किंवा PDS केंद्र जाव लागणार आहे.
  • आधार आणि रेशन कार्ड ऑफलाइन लिंक करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या रेशन कार्डची मूळ आणि एक फोटोकॉपी, तुमचं आधार कार्डची मूळ आणि एक फोटोकॉपी, एक पासपोर्ट साईझ फोटो या डॉक्युमेंट्सची आवश्यकता असणार आहे.
  • आधार सीडिंगसाठी अर्ज भरा, त्याची फोटोकॉपी अटॅच करा आणि सायबर केंद्रात किंवा PDS अधिकाऱ्याकडे सबमिट करा.
  • येथे अधिकारी तुमच्या आधार तपशीलांची पुष्टी करण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण (फिंगरप्रिंट स्कॅन) विचारू शकतात.
  • प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक संदेश प्राप्त होईल. ज्यामुळे तुम्हाला समजेल तुमचं आधार कार्ड रेशन कार्डसोबत लिंक झालं की नाही.

Web Title: Tech news how to link your aadhaar card with ration card know online and offline process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • aadhaar card
  • Tech News

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!
1

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
2

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स
3

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..
4

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.