OpenAI चे सिईओ Sam Altman भारत दौऱ्यावर! भारतातील AI भविष्याबाबत केलं मोठं विधान
जगातील प्रसिध्द AI कंपनी OpenAI चे सिईओ सॅम ऑल्टमन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सॅम ऑल्टमन यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत भारतातील AI भविष्याबाबत चर्चा केली आहे. या चर्चेत सॅम ऑल्टमन यांनी AI आणि भारत या दोन्हीबाबत एक मोठं भाकित केलं आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सॅम ऑल्टमन यांनी सांगितलं की, भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चे भविष्य उज्ज्वल आहे. भारत केवळ OpenAI साठीच नाही तर संपूर्ण AI क्षेत्रासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. गेल्या वर्षभरात आमच्या वापरकर्त्यांची संख्या तिप्पट झाल्याने ही आमची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Asus चा नवा गेमिंग स्मार्टफोन लाँच; 185Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
ऑल्टमन जगाच्या दौऱ्यावर आहेत आणि मंगळवारी रात्री उशिरा भारतात आले. बुधवारी त्यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव तसेच देशातील अनेक स्टार्ट-अप्स आणि व्हेंचर कॅपिटल फंडांची भेट घेतली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याची अपेक्षा आहे. शिवाय त्यांनी AI आणि भारत या दोन्हीबाबत एक मोठं भाकित केलं आहे.
सॅम ऑल्टमन म्हणाले की, भारताने AI तंत्रज्ञानाचा वेगाने स्वीकार केला आहे आणि चिप प्रोडक्शन, मॉडल डेवलपमेंट आणि व्यावसायिक वापर यासारख्या विकासाच्या सर्व स्तरांवर वेगाने काम करत आहे. गेल्या वर्षात OpenAI च्या भारतीय वापरकर्त्यांची संख्या तीन पटीने वाढली आहे. भारताने त्याच्या पूर्ण स्टॅक मॉडेलसह, एआय क्रांतीमध्ये आघाडीच्या देशांमध्ये सामील व्हावे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या “फायरसाईड चॅट” दरम्यान, ऑल्टमन यांनी खुलासा केला की ओपनएआयने गेल्या वर्षभरात भारतात वापरकर्त्यांची संख्या तिप्पट केली आहे. त्यांनी एआय क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले.
भारत AI च्या क्षेत्रातही मजबूत स्थान निर्माण करत आहे. याबाबत आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, नवोपक्रम कोणत्याही देशात घडू शकतो. AI क्षेत्रातही भारत एक आघाडीचा देश बनण्याची पूर्ण क्षमता आहे. आम्ही लवकरच एक सुरक्षित आणि परवडणारे AI मॉडेल लाँच करणार आहोत. हे AI मॉडेल इतर देशांच्या AI मॉडेल्सपेक्षा अधिक किफायतशीर असेल.
चीनने अलीकडेच डीपसीक हे कमी किमतीचे AI मॉडेल लाँच केले. आता भारत त्याच्या मूलभूत AI मॉडेलवर वेगाने काम करत आहे. यासाठी, सरकारने १८,६९३ जीपीयू असलेली AI लॅब स्थापन केली आहे, जी या क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल. भारताची AI रणनीती केवळ आर्थिक विकासापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण डिजिटल इकोसिस्टम तयार करण्याचीही योजना आहे.