Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

16 जानेवारीला बंद राहणार इंटरनेट? संपूर्ण जगात असेल Digital Shutdown? काय आहे व्हायरल व्हिडीओमागील सत्य

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की उद्या म्हणजेच 16 जानेवारी रोजी संपूर्ण जगाचे इंटरनेट बंद राहणार आहे. पण हे खरं आहे का की हा फक्त दावा आहे? सत्य जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 15, 2025 | 09:00 AM
16 जानेवारीला बंद राहणार इंटरनेट? संपूर्ण जगात असेल Digital Shutdown? काय आहे व्हायरल व्हिडीओमागील सत्य

16 जानेवारीला बंद राहणार इंटरनेट? संपूर्ण जगात असेल Digital Shutdown? काय आहे व्हायरल व्हिडीओमागील सत्य

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खरे असतात तर काही व्हिडी फेक असतात. तर अनेक व्हिडीओमध्ये असे दावे केले जातात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणं फार कठीण असतं. आता देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे.

Tech Tips: Instagram वर ब्लू टिक मिळवणं आता अगदी सोपं! 6 स्टेप्समध्ये व्हेरिफाईड होईल तुमचं अकाऊंट

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की उद्या म्हणजेच 16 जानेवारी रोजी संपूर्ण जगाचे इंटरनेट बंद राहणार आहे. प्रसिद्ध ॲनिमेटेड शो ‘द सिम्पसन्स’ ने 16 जानेवारी 2025 रोजी जागतिक इंटरनेट बंद होण्याची भविष्यवाणी केली होती. सध्या त्यांच्या या भविष्यवाणीचाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, एक विशाल शार्क समुद्राखाली टाकलेल्या इंटरनेट केबल्स कापतो, त्यामुळे जगभरात इंटरनेट सेवा बंद आहे. indepthnotion नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंवर याबाबतचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटनाशी संबंधित दावा

या व्हिडीओमध्ये 16 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटनाशी संबंधित दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले जात आहे आणि तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीशी संबंधित आहे, परंतु वास्तविकता अशी आहे की ट्रम्प यांचा शपथविधी 20 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. जे या दाव्याची सत्यता सिद्ध करते पण त्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

सत्य काय आहे?

हा व्हिडीओ पूर्णपणे एडिट केलेला असल्याचे तज्ज्ञ आणि तथ्य तपासणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे. ‘द सिम्पसन्स’ने अशी भविष्यवाणी कधीच केली नव्हती. आम्ही तुम्हाला सांगतो की ‘द सिम्पसन्स’ त्याच्या व्यंग्य आणि काल्पनिक अंदाजांसाठी ओळखला जातो, परंतु व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेले दृश्य शोच्या कोणत्याही अधिकृत भागाशी जुळत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

व्हिडिओ का व्हायरल झाला?

खरं तर, बनावट किंवा खळबळजनक मजकूर सोशल मीडियावर वेगाने पसरतो. हा व्हिडिओ ‘द सिम्पसन्स’ची विश्वासार्हता आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय प्रभावाशीही जोडला गेला आहे, ज्यामुळे तो अधिक व्हायरल होत आहे. यासोबतच इंटरनेट बंद सारख्या काल्पनिक परिस्थितीमुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

खरं तर, ‘द सिम्पसन्स’ शोने अनेक वेळा अशा घटना दाखवल्या आहेत ज्या नंतर वास्तव बनल्या, जसे की स्मार्ट घड्याळे किंवा ट्रम्प 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष बनले. पण या प्रकरणात शोचा अंदाज पूर्णपणे खोटा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Gen Z किड्समध्ये वाढतोय ‘टेलिफोनोफोबिया’! कॉल येताच वाटते भिती, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

16 जानेवारी 2025 रोजी जागतिक इंटरनेट बंद झाल्याचा दावा केवळ एडीट व्हिडिओवर आधारित आहे. यात काही तथ्य नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ‘द सिम्पसन्स’ शोच्या नावाने ही एक काल्पनिक आणि बनावट कथा आहे. त्यामुळे अशा व्हायरल मजकूराची सत्यता न तपासता त्यावर विश्वास ठेवून अजिबात घाबरू नका. भविष्यातही, असा कोणताही खळबळजनक व्हिडिओ तुम्हाला आढळल्यास, त्याची सत्यता न तपासता तो शेअर करणे टाळा. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांपासून सावध राहा.

Web Title: Tech news there will be digital shutdown on 16 january what is truth behind the viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

गेमर्ससाठी मोठी बातमी! सॅमसंगने जगातील पहिला 6K 3D गेमिंग मॉनिटर केला लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
1

गेमर्ससाठी मोठी बातमी! सॅमसंगने जगातील पहिला 6K 3D गेमिंग मॉनिटर केला लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

iPhone चा मोठा डाव! चिनी कंपन्यांना देणार तगडी टक्कर, 200MP Camera सह घालणार धुमाकूळ; Apple ची जोरदार तयारी
2

iPhone चा मोठा डाव! चिनी कंपन्यांना देणार तगडी टक्कर, 200MP Camera सह घालणार धुमाकूळ; Apple ची जोरदार तयारी

मोबाईलच्या एअरप्लेन मोडचा ‘या’ पद्धतीने करा वापर, कामात एकाग्रता वाढण्यासोबतच बॅटरी राहील जास्त वेळ टिकून
3

मोबाईलच्या एअरप्लेन मोडचा ‘या’ पद्धतीने करा वापर, कामात एकाग्रता वाढण्यासोबतच बॅटरी राहील जास्त वेळ टिकून

सर्वांचं घामटं काढायला बाजारात येतेय Samsung Galaxy S26 सिरीज, Launch Date आली समोर; उत्सुकता शिगेला
4

सर्वांचं घामटं काढायला बाजारात येतेय Samsung Galaxy S26 सिरीज, Launch Date आली समोर; उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.