eSIM म्हणजे काय? फिजिकल सिम कार्डपेक्षा किती वेगळे? कोणत्या डिव्हाईसना करतं सपोर्ट? जाणून घ्या सविस्तर
आजच्या डिजिटल युगात सर्व कामं डिजीटली केली जात आहेत. ऑनलाईन पेमेंट करण्यापासून ते ऑनलाईन शॉपिंग करण्यापर्यंत, सर्व कामं अगदी स्मार्टफोनच्या एका क्लिकवर पूर्ण होत आहेत. पूर्वी ज्या कामांसाठी खूप वेळ लागत होता, तीच कामं आज ऑनलाईन पद्धतीमुळे एका क्षणात होत आहेत. डिजिटल पेमेंट आणि इतर कामांसोबतच आता तुमच्यासाठी डिजिटल सिमकार्ड देखील उपलब्ध आहे. होय, हे खरं आहे. पारंपरीक सिमकार्डचा वापर करण्यासोबतच आता तुम्ही eSIM चा देखील वापर करू शकणार आहात.
Google ने आणलं नवं AI फीचर! अचूक हवामान अपडेटसह मिळणारसह अनेक सुविधा
eSIM नेमकं काय आहे, त्याचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो, eSIM कोणत्या स्मार्टफोन्सना सपोर्ट करतो आणि कोणत्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना eSIM ऑफर करतात याबद्दल अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. चला तर मग eSIM बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनमध्ये वापरले जाणारे सिम कार्ड देखील अपग्रेड केले जात आहेत. जिथे पूर्वी मोठ्या आकाराचे सिमकार्ड असायचे तिथे आता नॅनो सिमचा वापर केला जात आहे. प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये नॅनो सिमचा वापर केला जातो. पण आता नॅनो सिमसोबतच आणखी एक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे, ज्याचे नाव आहे eSIM (एम्बेडेड सिम). eSIM हे एक डिजिटल सिम आहे जे प्रत्यक्ष सिम कार्डची गरज दूर करू शकते.
eSIM चे म्हणजेच एम्बेडेड सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल. हे एक आभासी सिम कार्ड आहे, जे फोनमध्येच एम्बेड केलेले आहे. तुम्हाला eSIM चा वापर करायचा असेल तर तुम्हाला ते स्वतंत्रणपणे खरेदी करण्याची गरज नाही. eSIM सॉफ्टवेअरद्वारे सक्रिय केले जाते. स्मार्टफोन व्यतिरिक्त, eSIM तंत्रज्ञान स्मार्टवॉच, टॅबलेट आणि इतर इंटरनेट कनेक्टेड उपकरणांमध्ये देखील वापरले जाते.
फिजिकल सिम तुम्हाला दुकानातून खरेदी करावं लागतं. फिजिकल सिम तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंसर्ट करू शकता. पण eSIM एक आभासी सिम कार्ड आहे, ज्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही. eSIM सॉफ्टवेअरद्वारे सक्रिय केले जाते. तर फिजिकल सिम सक्रीय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सॉफ्टवेअरची नाही तर रिचार्जची गरज असते.
Apple, Samsung, Google Pixel आणि इतर प्रमुख ब्रँडच्या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये eSIM सपोर्ट उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, हे तंत्रज्ञान ऍपल वॉच, सॅमसंग गॅलेक्सी वॉच आणि काही लॅपटॉपसारख्या स्मार्टवॉचमध्ये देखील आहे.
भारतातील प्रमुख दूरसंचार कंपन्या जसे की Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) eSIM सुविधा प्रदान करतात. ते सक्रिय करण्यासाठी, वापरकर्त्याला त्याच्या नेटवर्क प्रदात्याशी संपर्क साधावा लागेल.