
Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान
काउंटडाऊन सुरू! टेकविश्वाचे Appleकडे लक्ष, मेगा इव्हेंटमध्ये iPhoneसह नव्या डिव्हाईसवरून उठणार पडदा
चार्जिंग पोर्ट ढिला होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजेच पोर्टमध्ये घाण किंवा धूळ जमा होणं. पोर्टमध्ये सहसा माती किंवा खिशाच्या कापडाचे छोटे धागे अडकतात. यामुळे चार्जिंग केबल पोर्टमध्ये पूर्णपणे आत जाऊ शकत नाही आणि कनेक्शन कमजोर होऊ लागते. अशा परिस्थितीत स्मार्टफोनमध्ये केबल लावताना बदल जाणवू लागतो आणि चार्जिंगमध्ये देखील समस्या येऊ शकतात. चार्जिंग केबल पोर्टमध्ये पूर्वीसारखी घट्ट बसत नाही, त्यामुळं अनेकांना वाटत की चार्जिंग पोर्ट ढिला झाला आहे. मात्र या ठिकाणी खरी समस्या पोर्टमध्ये असते. (फोटो सौजन्य: Pinterest)
प्रत्येकवेळी समस्या स्मार्टफोनच्या पोर्टमध्ये असेलच असे नाही. खरं तर अनेकदा खराब, घासलेली किंवा वाईट क्वालिटीची चार्जिंग केबल देखील या समस्याचे कारण असू शकते. अशा पोर्टमध्ये केबल योग्य प्रकारे बसत नाहीत आणि यामुळे चार्जिंग वारंवार डिस्कनेक्ट होते. यामुळे तुमच्या स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट खराब झाला आहे असे मानण्यापूर्वी एकदा चांगल्या क्वालिटीच्या चार्जिंग केबलाचा वापर करून पहा. जर चांगल्या क्वालिटीच्या चार्जिंग केबलचा वापर केल्याने तुम्हाला कोणत्याही समस्या येत नसतील तर याचा अर्थ चार्जिंग पोर्टमध्ये कोणतीही समस्या नव्हती.
चार्जिंग पोर्टच्या रोजच्या वापराने त्यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असते. वारंवार केबल पोर्टमध्ये जोडल्याने काही प्रमाणात तोडफोड होऊ शकते. वारंवार केबल कनेक्ट करणे आणि काढणे यामुळे पोर्टमध्ये असलेला कनेक्टर हळू हळू घासू लागतो. तसेच केबल जोरात कनेक्ट करणे किंवा वाकड्या पद्धतीने काढणे यासारख्या प्रकारामुळे पोर्ट पूर्णपणे खराब होण्याची शक्यता असते. सहसा जुन्या स्मार्टफोनमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात असते. विशेषतः जेव्हा तुम्ही अनेक वर्षांपासून स्मार्टफोन वापरत असाल अशा वेळी ही समस्या आढळते.
पोर्टमध्ये जर धूळ किंवा माती साचली असेल अशावेळी स्वच्छता करताना योग्य काळजी घेणे आवश्यक असते. स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट साफ करताना सुई, पिन किंवा दुसऱ्या टोकदार वस्तूंचा वापर करू नका, असे केल्यास नुकसान होऊ शकते. पिन, सुई किंवा टोकदार वस्तूंचा वापर केल्यास शॉर्ट-सर्किट होण्याची देखील शक्यता असते.