Instagram Down: अचानक बंद पडले सोशल मीडिया अॅप! हजारो यूजर्स त्रस्त; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
दुसऱ्या बाजूला, भारतातील 900 हून अधिक यूजर्सनी नोंदवले आहे की, त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात अडचण येत आहे. जास्तीत जास्त तक्रारी मोबाईल अॅपसंबंधित आहेत. डाउनडिटेक्टरवर शेअर करण्यात आलेल्या डेटानुसार, सुमारे 78 टक्के यूजर्सनी इंस्टाग्राम अॅपचा वापर करण्यात अडचण येत असल्याचे नोंंदवले आहे. तर 13 टक्के यूजर्सनी नोंदवले आहे की, त्यांना वेबसाईटचा वापर करण्यात अडचण येत आहे. तर 10 टक्के लोकांनी सांगितले आहे की त्यांना सर्व्हर कनेक्शनमध्ये समस्या येत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
everyone coming to X to see if Instagram is down😭 #Instagramdown
pic.twitter.com/IcHmPRZ17o — . (@goatspriv) March 11, 2026
is instagram down rn??? dms arent working for me is it just me — azZui (@azZuiix) March 11, 2026
Instagram trying to fix their servers rn #instagramdown pic.twitter.com/6mpihtX2FX — mario (@miomww) March 11, 2026
instagram going down immediately after i finally respond to my friend i left on delivered for 2 days pic.twitter.com/YJVlDbiZwR — jd (@wingliders) March 11, 2026
डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील यूजर्सना आज बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून यूजर्सना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचा वापर करण्यात अडचण येत आहे. यानंतर, त्रासलेल्या यूजर्सनी त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी एक्स प्लॅटफॉर्मवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. एका यूजरने लिहील आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम डाऊन आहे की नाही हे तपासण्यासाठी यूजर्स एक्सकडे वळत आहेत. तर दुसऱ्या एका यूजरने पोस्ट शेअर करत लिहीले आहे की, जेव्हा मी एखादा महत्त्वाचा डीएम पाठवू इच्छितो तेव्हा इंस्टाग्राम डीएम बंद होतो.
सकाळी सुमारे 8 वाजल्यापासून यूजर्सना इंस्टाग्रामचा वापर करण्यात समस्या येत आहेत. मात्र अद्याप मेटाने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले नाही. इंस्टाग्राममध्ये समस्या येणाऱ्या यूजर्सना आता मेटा समस्या शोधून प्लॅटफॉर्म पुन्हा व्यवस्थित करेपर्यंत वाट पहावी लागेल.






