गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस! बजेटमध्ये मिळणारी ही किचन उपकरणे करतील मोठी बचत, आत्ताच करा खरेदी
भारतात व्यवसायिक गॅसचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. याचा परिणाम खानावळी आणि हॉटेलवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय घरगुती गॅस बुकिंगचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे. त्यामुळे गृहिणींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जर घरात गॅसच नसेलॉ, तर सर्व कामं अडकून राहतील. पण अशा काही सोप्या पद्धती आहेत त्यामुळे तुम्ही गॅसवरील अवलंबित्व कमी करू शकता आणि तुमचे किचन पूर्णपणे गॅस फ्री करू शकता. (फोटो सौजन्य – AI Created)
मध्यपूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील गॅस पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. भारतात 14.2 किलो वाले वजनाचा घरगुती LPG गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला असून बुकिंग कालावधी देखील 25 दिवस करण्यात आला आहे. भारतात गॅसवर अवलंबून राहिल्यामुळे, एक सामान्य कुटुंब दरवर्षी केवळ गॅसवर किमान 11,000 ते 12,000 रुपये खर्च करते. मात्र या तंत्रज्ञानाच्या जगात तुम्ही काही किचन अप्लायन्सेस वापरून गॅसवरील तुमचे अवलंबित्व कमी करू शकता. हे किचन अप्लायन्सेस खरेदी करण्यासाठी तुम्हाला एकदाच खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही विजेचा वापर करून किचन अप्लायन्सेस वापरू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की किचन अप्लायन्सेस गॅसचा वापर करावा लागणार नसला तरी विजेचा खर्च करावा लागणार आहे. हे इलेक्ट्रिक ऑप्शन्स कोणते आहे जाणून घेऊया.
इलेक्ट्रिक इंडक्शन किचनमधील कामांसाठी सर्वात महत्त्वाचे आणि गरजेचे किचन अप्लायन्स आहे. 1600W चे इंडक्शन सहसा 1,999 रुपयांच्या सुरवातीच्या किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या इंडक्शनमध्ये तुम्ही सर्व प्रकारचे जेवण तयार करू शकता. तुम्ही तुमच्या गरजेच्या हिशोबाने दोन इंडंक्शन खरेदी करू शकता.
विजेवर चालणारे हे किचन अप्लायन्स देखील अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये जेवण गरम करण्यापासून पिझ्झा आणि केक बनवण्यापर्यंत अनेक काम केली जाऊ शकतात. तुम्ही 2 हजार रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीत तुमच्या गरजेनुसार ओव्हन खरेदी करू शकता.
इलेक्ट्रिक राइस किंवा मल्टी कुकर देखील बाजारात उपलब्ध आहेत. या अप्लायंसेसची किंमत 1,200 रुपयांपासून 1,800 रुपयांपर्यंत असते. हे डाळ, भात, खिचडी किंवा अनेक प्रकारच्या भाज्या बनवण्यासाठी वापरले जाऊ शकतात.
600 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत तुम्ही इलेक्ट्रिक केटल खरेदी करु शकता. हे किचन अप्लायंस अत्यंत फायद्याचं आहे. तुम्ही इलेक्ट्रिक केटलचा वापर करून पाणी गरम करू शकता, चाय बनवू शकता किंवा अंडी उकळवू शकता. बजेट किंमतीत उपलब्ध असणारे इलेक्ट्रिक अप्लायंसेज खरेदी करून तुम्ही तुमचे किचन गॅस फ्री करू शकता.






