Tech Tips: पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? प्रवासादरम्यान हे गॅझेट्स तुमच्यासाठी ठरतील वरदान
पावसाळ्यात फिरायला जाणं कोणाला नाही आवडतं? कोणी आपल्या मित्रांसोबत तर कोणी गर्लफ्रेंडसोबत तर कोणी आपल्या कुटूंबासोबत कुठे ना कुठे नक्कीच फिरायला जातात. कोणी कोकणात जात तर कोणी धबधब्यावर. पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते आणि वातावरणात देखील गारवा असतो. अशा थंडगार वातावरणात फिरायला जाण्याची मजा काही वेगळीच असते.
Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?
यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही देखील ट्रीपला जाण्याच्या प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. असे काही गॅझेट्स आहेत, जे प्रवासात तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात आणि तुमची साथ देऊ शकतात. जर तुम्ही लाँग विकेंडचा प्लॅन करत असाल तर हे गॅझेट्स तुमच्यासाठी बरेच फायदेशीर ठरणार आहेत. असे काही गॅझेट्स आहेत, ज्यांच्या मदतीने तुमचा प्रवास आणखी मजेदार होणार आहे. चला तर मग अशा गॅझेट्सबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
ट्रॅवलदरम्यान तुमच्या बॅगेत केबल्स, चार्जर आणि अडॅप्टर नक्की ठेवा. हे सर्व सामान ठेवण्यासाठी तुम्ही टेक ऑर्गनाइझर बॅग खरेदी करू शकता. यामध्ये तुमचे सर्व गॅझेट्स अगदी व्यवस्थित राहू शकतात, जसं की केबल्स, SD कार्ड, ईयरबड्स आण पावर बँक. जर ही बॅग वॉटरप्रूफ असेल तर अजूनचं फायदा.
प्रवासादरम्यान स्मार्टफोनची मदत नकाशा, कॅमेरा, गाइड आणि एंटरटेनमेंटसाठी घेतली जाते. मात्र जर स्मार्टफोनची बॅटरी संपली तर? अशा परिस्थितीत पावर बँक तुमची मदत करू शकतो. 10,000 ते 20,000mAh चा फास्ट चार्जिंग सपोर्ट वाला पावर बँक प्रवासादरम्यान तुमतच्यासोबत ठेवा. काही मॉडेल्समध्ये इनबिल्ट केबल किंवा वायरलेस चार्जिंगची सुविधा असते.
पार्टी करायची असेल किंवा समुद्रावर मस्ती करायची असेल तर पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अशी स्पीकरची निवड करा जो वॉटरप्रूफ असेल. याची चार्जिंग कमीत कमी 10 तास चालू शकते.
ट्रेनचा आवाज किंवा जवळपासच्या मुलांच्या किंकाळ्यांपासून शांतता पाहिजे असेल तर अशावेळी केवळ नॉइज कँसलिंग ईयरबड्स तुमची मदत करू शकतात. नॉइज कँसलिंग ईयरबड्स केवळ गाणी ऐकण्यासाठीच नाही तर मानसिक शांतीसाठी देखील फायद्याचे ठरणार आहे.
प्रवास करताना खूप फोटो आणि व्हिडिओ काढणं अगदी सहाजिक आहे. पण हे सर्व फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी पोर्टेबल एसएसडीची आवश्यकता असते. पोर्टेबल एसएसडी केवळ डेटा सुरक्षित ठेवत नाही तर जलद ट्रान्सफर देखील करते.
वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे सॉकेट्स असतात. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी चार्जर बदलणं कठिण असतं. अशावेळी तुम्ही एक यूनिवर्सल ट्रॅवल अडॅप्टर खरेदी करू शकता. अनेक अडॅप्टर आता मल्टीपल USB पोर्ट्स आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतात.