
पगारावर भार नकोय? फक्त 2,666 रुपयांच्या ईएमआयवर घरी आणा नवा Tecno स्मार्टफोन! ऑफर्स पाहून तुम्हीही व्हाल खुश
टेक्नो स्पार्क गो 3 प्रो दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB + 64GB आणि 4GB + 128GB यांचा समावेश आहे. 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आणि 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र संपूर्ण पैसे भरून स्मार्टफोन खरेदी करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 6 महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील निवडू शकणार आहेत. यामध्ये तुम्हाला प्रति महिना केवळ 2,666 रुपये देऊन स्मार्टफोन घरी घेऊन येण्याची संधी मिळणार आहे. यामुळे तुमच्या पगारावर भार येणार नाही आणि तुम्हाला नवीन स्मार्टफोन देखील खरेदी करता येणार आहे. (फोटो सौजन्य: Tecno)
टेक्नोने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसह ऑफलाईन रिटेल स्टोअरमध्ये देखील खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा स्मार्टफोन बरगंडी रेड, एक्लिप्स ब्लॅक, बेसाल्ट टाइटेनियम आणि सनराइज ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. तसेच या स्मार्टफोनवर ग्राहकांना 1 वर्षाची मेन्यू फॅक्चर वॉरंटी देखील मिळणार आहे.
टेक्नो स्मार्टफोनमध्ये 1526×720 पिक्सेल रेजोल्यूशनवाली 6.78 इंच एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये वॉटर ड्रॉप नोच स्टाइलसह 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 580 निट्सची हाय ब्राइटनेस मिळणार आहे. फोनमध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षाणसाठी IP68 + IP69 रेटिंग दिली आहे. परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G81 चिपसेट दिला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5200mAh बॅटरी दिली आहे. या डिव्हाईसमध्ये ओटीजी, वाय-फाय, ब्लूटूथ आणि इन्फ्रारेड सेन्सर देखील दिले आहे. यामुळे फोनला टिव्हीच्या रिमोटप्रमाणे देखील वापरले जाऊ शकते.