IFA 2026 मध्ये Motorola चा जलवा; नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच!
OpenAIचा सर्वात शक्तिशाली ‘GPT-6 Astra’ लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स
मोटो वॉच अल्ट्रामध्ये वेअर ओएस, एलटीई कनेक्टिविटी आणि पोलार-पावर्ड हेल्थ ट्रॅकिंग देण्यात आली आहे. कंपनीने आपल्या ‘ब्रिलियंट कलेक्शन’चा भाग म्हणून ‘क्रिस्टल्स बाय स्वॅरोव्स्की’ वैशिष्ट्य असलेले ‘मोटोरोला रेझर’चे एक स्पेशल-एडिशन देखील सादर केले आहे. (फोटो सौजन्य: Motorola)
येत्या काही आठवड्यांत कंपनी त्यांचा स्मार्टफोन यूरोप आणि मिडिल ईस्टमधील निवडक देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नाही. तसेच हा स्मार्टफोन भारतात कधी उपलब्ध होणार, याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
मोटोरोला एज 70 प्लसमध्ये कोणते फीचर्स आणिस स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि पॅनटोन वॅलिडेटेड कलर कॅलिब्रेशनवाला 6.78-इंच एक्सट्रीम अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या स्क्रीनचे डिझाईन क्वाड-कर्व्ड आहे आणि हे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एमआयएल-एसटीडी-810एच टिकाऊपणाच्या मानकांची पूर्तता देखील करतो.
फोटोग्राफीसाठी कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन, 10x सुपर झूम आणि 4K व्हिडीओ रिकॉर्डिंग सपोर्टवाला 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक डेडिकेटेड मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो अडाप्टिव स्टेबलाइजेशनसह 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. ऑटोमेटेड इमेज प्रोसेसिंगसाठी मोटोरोलाने या डिव्हाईसमध्ये त्यांचे फोटो एन्हांसमेंट इंजिन देखील दिले आहे.
POCOने पुन्हा मारली बाजी! दोन तगड्या स्मार्टफोन्ससह भारतात एंट्री, किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या
मोटोरोला एज 70 प्लसमध्ये स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 3 चिपसेट दिला आहे, ज्याला 8GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसोबत जोडण्यात आले आहे. यामध्ये 45W टर्बोपॉवर चार्जिंग आणि बायपास चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.






