Upcoming Smartphones: या आठवड्यात लाँच होणार हे 3 जबरदस्त Smartphones! Samsung च्या सर्वात पातळ फोनचाही आहे समावेश
येणारा आठवडा स्मार्टफोन प्रेमींसाठी अत्यंत खास असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. हे स्मार्टफोन भरपूर फीचर्स आणि वैशिष्ट्यांनी सुसज्ज असणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. धिर धरा. या आठवड्यात एक, दोन नाही तर तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत.
Tech Tips: Google Pay च्या या 5 स्मार्ट ट्रिक्स तुम्हाला बनवतील एक्सपर्ट! आजच फॉलो करा
सॅमसंगपासून मोटोरोलापर्यंत अनेक स्मार्टफोन्सची आता बाजारात एंट्री होणार आहे. हे स्मार्टफोन्स प्रिमियम आणि मिडरेंजमध्ये लाँच होणार आहेत. या अपकमिंग स्मार्टफोन्समध्ये सर्वचजण गेल्या अनेक दिवसांपासून ज्या फोनची अगदी आतुरतेने वाट पाहत होते, तो स्मार्टफोन देखील लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन म्हणजे Samsung Galaxy S25 Edge. याशिवाय मोटोरोला त्यांचा सर्वात पावरफुल फ्लिप स्मार्टफोन देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे. थोडक्यात काय तर हा आठवडा स्मार्टफोन प्रेमींसाठी अगदी आनंदाचा ठरणार आहे. चला तर मग आता या अपकमिंग स्मार्टफोन्सबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
सॅमसंगचा द मोस्ट वेटेड स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Edge 13 मे रोजी लाँच केला जाणार आहे. हा सॅमसंगचा सर्वात पातळ स्मार्टफोन असणार आहे. या स्मार्टफोनची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत होते. या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 2K डिस्प्ले दिला जाणार आहे. यासोबतच डिव्हाईसला ऊर्जा देण्यासाठी स्नॅपड्रॅगनचा सर्वात पावरफुल चिपसेट 8 एलीट प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. यामध्ये 25 वॉट फास्ट चार्जिंगसाठी 3900mAh बॅटरी दिली आहे.
डिव्हाईसमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाणार आहे. ज्यामध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. फोन अल्ट्रा स्लिम डिझाईनसह लाँच केला जाणार आहे, ज्याची जाडी 5.84 मिलीमीटर असणार आहे. यामध्ये गोरिल्ला ग्लास सिरेमिक 2 2 प्रोटेक्शन दिलं जाणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 1,10,000 रुपये असू शकते.
13 मे रोजी Motorola Razr 60 Ultra देखील लाँच केला जाणार आहे. फोनची मायक्रोसाइट अॅमेझॉन इंडियावर लाईव्ह झाली आहे. ज्यावरून हा अंदाज लावला जाऊ शकतो की Motorola Razr 60 Ultra हा स्मार्टफोन जगातली सर्वात पावरफुल फ्लिप फोन असणार आहे. फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एलीट चिपसेट दिला जाणार आहे. स्मार्टफोनची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
Tech Tips: सोशल मीडियावर व्हायरल होणारा Video खरा की खोटा? अशा पद्धतीने घ्या शोध
या आगामी डिव्हाईसमध्ये 7 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याची पीक ब्राइटनेस 4500 निट्स असू शकते. स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा असू शकतो. स्मार्टफोनमध्ये 4700mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
या आठवड्यात लाँच होणारा तिसरा स्मार्टफोन म्हणजे Vivo V50 Elite Edition. हा स्मार्टफोन 13 मे रोजी भारतात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये Aura Light फीचर आणि अनेक AI-पावर्ड फोटो एडिटिंग फीचर्स देखील पाहायला मिळणार आहेत.