Tech Tips: सोशल मीडियावर व्हायरल होणारा Video खरा की खोटा? अशा पद्धतीने घ्या शोध
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान सोशल मीडियावर अनेक फेक पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कधी ड्रोन अटॅक तर कधी सरकारी अलर्ट्स दाखवण्यासाठी खोटे आणि जुने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. यातील अनेक व्हिडीओ तर गेममधील होते. हे गेममधील व्हिडीओ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा असल्याचं दावा करत सोशल मीडियावर शेअर केले जात होते. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ खरे आहेत कि खोटे याचा शोध घेणं फार कठीण आहे. कारण हे व्हिडीओ इतके खरे वाटतात की अगदी कोणीही त्याच्यावर विश्वास ठेऊ शकतो.
India Pakistan War: भारतीयांसाठी आयटी मंत्रालयाने जारी केली अॅडवायझरी, X वर पोस्ट करत दिल्या सूचना
सोशल मीडियावर या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंबाबत सरकार वेळोवेळी अलर्ट शेअर करत होते आणि नागरिकांनी या फेक व्हिडीओंवर विश्वास ठेऊ नये असं आवााहन देखील केलं जात होतं. नागरिकांमध्ये भिती आणि दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे फेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. पण तुम्ही काही सोप्या पद्धतीने हे व्हिडीओ खरे आहेत की खोटे याचा शोध घेऊ शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्हायरल होणारा व्हिडीओ कोणत्या अकाऊंटवरून सर्वात आधी शेअर करण्यात आला आहे, याचा शोध घ्या. जर व्हिडीओ अननोन अकाउंटवरून शेअर करण्यात आला असेल तर संशयास्पद असू शकतं. सीमा तणावासारख्या संवेदनशील काळात, ऑफिशियल न्यूज सोर्सेज किंवा सरकारी संस्था नेहमीच पुष्टीकृत विजुअल्स प्रसिद्ध करतात.
InVID किंवा Google Reverse Image Search सारख्या फ्री ऑनलाइन टूल्सवर तुमच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट अपलोड करा आणि इथे तुम्हाला माहिती मिळेल की हा व्हिडीओ कुठून आला आहे. सध्या, युद्धभूमीच्या नावाखाली प्रसारित होणारे बहुतेक व्हिडिओ जुने आहेत, जे इतर देशांचे किंवा जुन्या घटनांमधील आहेत, परंतु हे व्हिडीओ अलीकडील युद्धाचे असल्याचा दावा करत सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
PIB Fact Check सारख्या सरकारी एजेंसीची मदत घ्या. ही एजंसी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या व्हिडीओंवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अनेकदा असं होतं की एखादा फेक व्हिडीओ योग्य हेडलाइनसह शेअर केला जातो. त्यामुळे परिस्थितीत व्हिजीओची सत्यता तपासल्याशिवाय तो शेअर करू नका.
युद्धाच्या काळात दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर अनेक फेक व्हिडीओ सतत शेअर केले जात असतात. पण जर हे व्हिडीओ अनवेरिफाइड असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका आणि असे व्हिडीओ शेअर देखील करू नका.