Earthquake Warning: हे 3 स्मार्टफोन अॅप्स देतात भूकंपाची वॉर्निंग, आत्ताच इंस्टॉल करा
सोमवारी (17 फेब्रुवारी) पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोकं झोपेतून जागे झाले आणि घाबरून घराबाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र दिल्लीत होते आणि त्याची तीव्रता 4.0 इतकी होती. भूकंपाचे केंद्र दिल्लीत असल्याने आजूबाजूच्या परिसरात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोकं घाबरली होती.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी 5:36:55 वाजता नवी दिल्लीत 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारती हादरू लागल्या आणि लोक घराबाहेर पडले. झाडांवर बसलेले पक्षीही आवाज करत इकडे तिकडे उडू लागले. राष्ट्रीय भूकंप केंद्रानुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी होती. त्याचे केंद्र नवी दिल्लीत जमिनीपासून 5 किलोमीटर खोलीवर होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
भूकंप ही नैसर्गिक समस्या आहेत. जर याबद्दल आधीच अलर्ट केलं गेलं तर लोकांना या समस्येचा सामना करण्यासाठी मदत होऊ शकते. पण भूकंपाबद्दल आपल्याला आधीपासून अलर्ट कसं मिळेल याबद्दल अनेकांना माहिती नसते. असे काही स्मार्टफोन अॅप्स आहेत, जे भूकंपाची आधीपासूनच वॉर्निंग देतात. हे स्मार्टफोन अॅप्स त्यांच्या युजर्सना भूकंपाच्या काही सेकंद आधीच अलर्ट पाठवतात, जेणेकरून लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वेळ मिळेल.
आजच्या डिजिटल युगात, मोबाईल अॅप्स आपल्याला सर्व प्रकारच्या सोयी पुरवतात. अशा परिस्थितीत, अॅप्सकडून नैसर्गिक आपत्तींबद्दल इशारा मिळणं यात काही आश्चर्य नाही. आज आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम अॅप्सबद्दल सांगणार आहोत, जे भूकंप येण्यापूर्वी अलर्ट पाठवू शकतात.
हे अॅप कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बर्कले सीस्मोलॉजी लॅबमध्ये विकसित करण्यात आले आहे. हे अॅप भूकंपाच्या प्रायमरी वेव्सवर नियंत्रण ठेवते आणि तात्काळ अलर्ट पाठवते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे भूकंप होणार असेल, तर हे अॅप जीपीएसद्वारे वापरकर्त्याचे स्थान ट्रॅक करते आणि भूकंप आल्यावर नोटिफिकेशन पाठवते. भूकंपाची तीव्रता आणि परिणाम समजून घेण्यास देखील ते मदत करते.
हे अॅप Earthquake Alert LLC ने विकसित केले आहे. हे अॅप US Geological Survey कडून डेटा मिळवते आणि रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता दर्शवते. यात रिअल-टाइम मॅप आणि कस्टम नोटिफिकेशनची सुविधा आहे. नोएडा आणि भारतातील इतर भागांमध्ये भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स मिळविण्यासाठी हे सर्वोत्तम अॅप आहे.
हे अॅप European-Mediterranean Seismological Centre ने विकसित केले आहे. ते युरोप आणि आशियातील भूकंपांबद्दल त्वरित माहिती देते. तुम्ही अॅपवर भूकंपाचे अहवाल शेअर करू शकता, जे क्राउड-सोर्स केलेल्या डेटावर आधारित जलद अलर्ट प्रदान करते.
अँड्रॉइड डिव्हाइसेसमध्ये Google ची बिल्ट-इन भूकंप वॉर्निंग सिस्टम आहे. जेव्हा कोणत्याही भागात भूकंपाच्या लाटा जाणवतात तेव्हा गुगल अलर्ट पाठवते आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा देते.