हे आहेत जगातील टॉप 5 सर्वात महागडे Smartphones, स्पेसिफिकेशन्स आहेत खास! किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का
2025 मध्ये स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. स्मार्टफोनच्या जगात कंपन्यांनी बरीच प्रगती केली आहे. अनेक स्मार्टफोन त्यांच्या डिझाईन आणि फीचर्ससाठी ओळखले जातात. तर काही स्मार्टफोन्स त्यांच्या किंमतीसाठी प्रसिद्ध आहेत. स्मार्टफोनच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. पण आता आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या किंमती सर्वाधित आहेत. आता आम्ही तुम्हाला जगातील टॉप 5 महागड्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. या स्मार्टफोनच्या किंमती सोन्याच्या किंमतींएवढ्या आहेत.
हा स्मार्टफोन म्हणजेच एक लग्जरी डिव्हाईस आहे. 24 कॅरेट गोल्ड, रोज गोल्ड आणि प्लॅटिनमद्वारे तयार करण्यात आलेला हा आयफोन त्याच्या बॅक पॅनलवर लावण्यात आलेल्या गुलाबी डायमंडमुळे सर्वाधिक आकर्षक दिसतो. या फोनची किंमत 48.5 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 400 करोड आहे. हा फोन काही निवडक लोकांकडेच आहे आणि त्यात हाय-अँड सिक्योरिटी फीचर्स देण्यात आले आहेत ज्यामुळे तो केवळ स्टेटस सिम्बॉलच नाही तर सर्वात सुरक्षित फोन देखील बनतो. (फोटो सौजन्य – X)
Huawei नवीन आणि लेटेस्ट मॉडेल भविष्याची झलक सादर करते. याच्या ट्राय-फोल्डमध्ये 10.2 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. Kirin 9010 प्रोसेसर, AI क्षमता, प्रीमियम कॅमेरा सेटअप आणि अल्ट्रा-फास्ट चार्जिंग यामुळे हा फोन अत्यंत खास बनतो. हा स्मार्टफोन प्रिमियम कॅटेगरीमध्ये येतो. या फोनची किंमत सुमारे 3.5 लाख रुपये आहे.
1 मिलियन डॉलर्स किमतीचा हा फोनमटेरियल्स आणि हँडक्राफ्टेड डिझाइनचे उदाहरण आहे. या फोनच्या बॉडीमध्ये 18 कॅरेट गोल्ड आणि ब्लॅक डायमंड लावले आहेत. स्मार्टफोनचा मागील पॅनल 200 वर्ष जुन्या आफ्रिकन ब्लॅकवुडपासून बनलेला आहे. प्रत्येक युनिट अद्वितीय आहे आणि कुशल कारागिरांनी बनवलेले आहे. हा फक्त एक फोन नाही तर एक लक्झरी इन्वेस्टमेंट आहे.
या फोनची खासियत म्हणजे त्यावर 50 हून अधिक हिरे आहेत, ज्यात 10 अत्यंत दुर्मिळ ब्लू डायमंड आहेत. त्याची बॉडी प्लॅटिनमपासून बनलेली आहे ज्यामुळे ती अत्यंत टिकाऊ आणि आकर्षक बनते. यासोबतच, त्यात अत्याधुनिक एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जे सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. हा स्मार्टफोन खास अशा लोकांसाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांना स्टाईलसोबत सिक्योरिटी पाहिजे आहे. याची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे.
या फोनची किंमत देखील 1 मिलियन डॉलर आहे आणि हा आतापर्यंतच्या सर्वात आलिशान फोनपैकी एक आहे. हा फोन 18 कॅरेट व्हाइट गोल्डपासून बनवला आहे आणि त्यावर 120 कॅरेट VVS-1 ग्रेड हिरे जडलेले आहेत. त्याची डिझाईन, फिनिश आणि लूक खूप आकर्षक आहे. या फोनची संख्या अत्यंत मर्यादित आहे.