Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनोळखी नंबरसह आता दिसणार कॉलरचे नाव, TRAI आणि DoT ने घेतला मोठा निर्णय

एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन आला असेल तर तो नंबर कोणत्या व्यक्तीचा आहे, हे शोधण्यासाठी आपल्याला थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागते. पण आता असं होणार नाही. कारण TRAI आणि DoT चा नवा नियम जारी होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 29, 2025 | 10:43 AM
मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनोळखी नंबरसह आता दिसणार कॉलरचे नाव, TRAI आणि DoT ने घेतला मोठा निर्णय

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनोळखी नंबरसह आता दिसणार कॉलरचे नाव, TRAI आणि DoT ने घेतला मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • अनोळखी नंबरसह दिसणार कॉलरचं नाव
  • TRAI-DoT चा गेमचेंजर नियम लागू
  • अनोळखी नंबर ओळखणं झालं सोपं

आपल्या स्मार्टफोनवर आपल्याला दिवसभर अनेक कॉल येत असतात. यातील काही नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह असतात. तर काही कॉल्स अनोळखी नंबरवरून येतात. सतत अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तुम्ही देखील वैतागता का? अनोखळी नंबर कोणत्या व्यक्तीचा आहे, हे शोधण्यासाठी तुम्ही देखील थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घेता का? तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आणि दूरसंचार विभागाने एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना सतत अनोळखी  नंबरवरून कॉल येतात.

Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश

नवा निर्णय युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आणि दूरसंचार विभागाने घेतलेल्या या नव्या निर्णयानंतर आता तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला तर स्क्रीनवर केवळ तो नंबरच नाही तर त्या व्यक्तीचे नाव देखील दिसणार आहे. जसं ट्रूकॉलर कोणताही कॉल येताच युजर्सना त्या नंबरबाबत माहिती देते. मात्र आता युजर्सना अनोळखी नंबरबाबत माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज लागणार नाही. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आणि दूरसंचार विभागाने घेतलेला हा निर्णय युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

फसवणूक आणि बनावट कॉल्सना बसणार आळा

TRAI म्हणजेच टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आणि DoT म्हणजेच दूरसंचार विभागने मोबाईल कॉलसंबंधित फसवणूक आणि बनावट कॉल्सना आळा घालण्यासाठी एक नवीन व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या नवीन निर्णयानंतर युजर्सना अनोळखी व्यक्तीच्या नंबरसोबत त्याचे नाव देखील स्क्रीनवर दिसणार आहे.

युजर्सना स्क्रीनवर तेच नाव दिसणार आहे, जे मोबाइल नंबरसाठी KYC मध्ये दाखल करण्यात आले आहे. एवढंच नाही तर ही सुविधा डिफॉल्ट स्वरुपात अ‍ॅक्टिव्ह असणार आहे. जर गरज नसेल तर युजर्स ही सुविधा डिअ‍ॅक्टिव्हेट देखील करू शकणार आहेत. गेल्यावर्षी या सर्विसची चाचणी मुंबई आणि हरियाणा सर्कलमध्ये करण्यात आले होते.

भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड, भारतीय युजर्सची पसंती मिळणार का?

2024 मध्ये TR  AI ने ठेवला होता प्रस्ताव

खरं तर फेब्रुवारी 2024 मध्ये TRAI ने ‘Calling Name Presentation (CNAP)’ नावाची सर्विस लाँच केली जावी, असा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, हे फीचर तेव्हाच ऑन असेल जेव्हा ग्राहक विनंती करणार आहेत. यानंतर DoT ने TRAI ला सल्ला दिला की, ही सुविधा डिफॉल्ट रुपयात युजर्ससाठी उपलब्ध केली जाऊ शकते. तथापि, कोणीही ही सेवा बंद करण्याची विनंती करू शकतो. शेवटी, ट्रायने दूरसंचार विभागाचे मत मान्य केले. दोन्ही विभागांनी आता या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. ज्या लोकांनी Calling Line Identification Restriction (CLIR) सुविधा घेतली असेल तर त्यांचे नाव स्क्रीनवर दिसणार नाही. ही सूट विशेषतः इंटेलिजेंस एजेंसि, व्हीआयपी आणि निवडक व्यक्तींना दिली जाईल. सीएलआयआरसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची सखोल तपासणी केली जाईल.

Web Title: Trai and dot important decision now users can see unknown caller name without third party app tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश
1

Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश

भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड, भारतीय युजर्सची पसंती मिळणार का?
2

भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड, भारतीय युजर्सची पसंती मिळणार का?

भारतीयांसाठी खुशखबर! ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी ‘फ्री’; इतक्या रुपयांची होणार बचत
3

भारतीयांसाठी खुशखबर! ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी ‘फ्री’; इतक्या रुपयांची होणार बचत

Nothing Phone 3a Lite: स्वस्तात मस्त आणि अनुभव मिळणार जबरदस्त! नोटिफिकेशन इंडिकेटर आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज असेल नवा स्मार्टफोन
4

Nothing Phone 3a Lite: स्वस्तात मस्त आणि अनुभव मिळणार जबरदस्त! नोटिफिकेशन इंडिकेटर आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज असेल नवा स्मार्टफोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.