Asus चे दोन नवीन लॅपटॉप भारतात लाँच, टच स्क्रीन डिस्प्ले आणि अनोख्या फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
टेक कंपनी Asus चे दोन नवीन लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये Asus Vivobook S14 आणि Vivobook S14 Flip यांचा समावेश आहे. या लॅपटॉपचं लाँचिंग मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालं. ही नवीन Vivobook S-सीरीज लॅपटॉप 13th Gen Intel Core i5 प्रोसेसरसह Intel UHD ग्राफिक्सने सुसज्ज आहे, याला 16GB रॅमसह जोडण्यात आलं आहे.
Asus Vivobook S14 लॅपटॉपची किंमत भारतात 67,990 रुपयांपासून सुरु होते. तर Asus Vivobook S14 Flip ची सुरुवातीची किंमत 69,990 रुपये आहे. दोन्ही लॅपटॉप कूल सिल्वर कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. 2-इन-1 Vivobook S14 Flip ला Asus ई-शॉप आणि Flipkart वरून खरेदी केले जाऊ शकते. हा Asus एक्सक्लूसिव स्टोर्स, रीजनल रिटेल पार्टनर्स आणि मल्टी-ब्रँड रिटेल स्टोर्समध्ये देखील खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर, Vivobook S14 ला Asus ई-शॉप आणि Flipkart वरून खरेदी केले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – X)
Flip it your way🤩
The ASUS Vivobook S14 Flip (TP3402VAO) offers 360° flexibility and Intel Core i5 performance, with enhanced privacy features.
Click on the link below:https://t.co/gKtZyGvqrB
Get yours now!#ASUSIndia #VivobookSSeries #VivobookS14Flip pic.twitter.com/9X5y3uMWQx
— ASUS India (@ASUSIndia) April 22, 2025
Asus Vivobook S14 आणि Vivobook S14 Flip दोन्ही लॅपटॉपमध्ये 14-इंच WUXGA (1,920×1,200 पिक्सेल) IPS LCD स्क्रीन देण्यात आली आहे, जी 60Hz रिफ्रेश रेट, 16:10 आस्पेक्ट रेशियो आणि 300 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करते. Vivobook S14 Flip चा डिस्प्ले टचस्क्रीन पॅनल आहे, जो स्टाइलस सपोर्टसह 360-डिग्री रोटेशन ऑफर करतो. Asus Vivobook S14 आणि Vivobook S14 Flip लॅपटॉप Intel Core i5-13420H CPU सह Intel UHD ग्राफिक्सने सुसज्ज आहेत. यामध्ये 16 जीबी रॅम आहे, जी दुसऱ्या स्लॉटद्वारे 24 जीबी पर्यंत वाढवता येते आणि त्यांच्याकडे 512 जीबी एम.2 एनव्हीएम एसएसडी आहे.
दोन्ही लॅपटॉपमध्ये प्रायव्हसी शटरसह 1080p फुल-HD कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये Wi-Fi 6E आणि Bluetooth 5.3 यांचा समावेश आहे. Asus Vivobook S14 मध्ये दोन USB 2.0 Type-A पोर्ट्स, दोन USB 3.2 Gen 1 Type-C पोर्ट्स आणि एक HDMI 2.1 पोर्ट आहे.
Vivobook S14 Flip मध्ये एक USB 2.0 Type-A पोर्ट, एक USB 3.2 Gen 2 Type-A पोर्ट, एक USB 3.2 Gen 2 Type-C पोर्ट आणि एक HDMI 2.1 पोर्ट आहे. दोन्ही मॉडल्समध्ये 3.5mm कॉम्बो ऑडियो जॅक आहे.
Asus Vivobook S14 मध्ये 4-सेल 70Wh Li-ion बॅटरी आहे, जी 65W वर चार्ज केली जाऊ शकते. Vivobook S14 Flip मध्ये 3-सेल 50Wh Li-ion बॅटरी आहे, जी 90W चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही मॉडेल्समध्ये US MIL-STD 810H ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशन आहे. Vivobook S14 ची साइज 315.2×223.4×17.9mm आणि वजन 1.4kg आहे. तर Vivobook S14 Flip ची साइज 313.2×227.6×18.9mm आणि वजन 1.5kg आहे.