रोबोट डॉग 'चंपक' बनला सोशल मीडियाचा हिरो! 'तारक मेहता' फॅन्सही झाले खुश; म्हणाले, हे तर आमचे चंपक चाचा... रोबोट डॉग 'चंपक' बनला सोशल मीडियाचा हिरो! 'तारक मेहता' फॅन्सही झाले खुश; म्हणाले, हे तर आमचे चंपक चाचा...
आयपीएल 2025 मध्ये रोबोट डॉग चंपक सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. या अनोख्या रोबोट डॉगने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आतापर्यंत लोकं क्रिकेटर्सचे फॅन्स होते, पण आता लोकं या व्हायरल रोबोट डॉगचे देखील फॅन्स झाले आहेत. मजेदार कृत्यांमुळे आणि स्टंटमुळे क्रिकेटर्स देखील रोबोट डॉगसोबत खेळत आहेत. 20 एप्रिल रोजी या रोबोट डॉगचे नाव चंपक ठेवण्यात आलं. यावेळी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस आला.
तारक मेहता का उल्टा चश्मामधील चंपकलाल आणि रोबोट डॉग्स चंपकच्या मिम्सने सोशल मीडियावर लोकांना वेड लावलं आहे. खरंतर, आयपीएल सामन्यांदरम्यान खेळाडूंचे फोटो काढणाऱ्या या गोंडस रोबोट कुत्र्याचे नाव ‘चंपक’ ठेवण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स (एमआय) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यातील सामन्यापूर्वी आयपीएलने इंस्टाग्रामवर हे नाव जाहीर केले. हे नाव ऑनलाइन पोलद्वारे निवडण्यात आले आणि चाहत्यांनी ‘चंपक’ या नावाला सर्वाधिक मते दिली. रोबोट डॉगचे हे नाव सोशल मीडिया युजर्सना देखील प्रचंड आवडलं. (फोटो सौजन्य – X)
आयपीएलमधील हा रोबोट डॉग एक शक्तिशाली तंत्रज्ञानाचे एक उदाहरण आहे. तो चालू शकतो, धावू शकतो, उडी मारू शकतो आणि अगदी दोन पायांवर उभाही राहू शकतो. त्यात एक कॅमेरा देखील बसवण्यात आला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना सामन्यादरम्यान पडद्यामागील झलक पाहता येते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर रोबोट डॉग्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये रोबोट डॉग कधी चिअर गर्ल्ससोबत डान्स करताना दिसत आहे, तर कधी क्रिकेटर्ससोबत ग्राऊंडवर मस्ती करताना दिसत आहे.
We asked and you answered ✍️
Based on fan votes, we present ‘Champak’ – the newest member of our family 🗳🥳#TATAIPL pic.twitter.com/D2x1o8FeDR
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
THE IPL ROBOT CAM NAME:
‘Champak’. 🐕 pic.twitter.com/OfgEMt80NB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 20, 2025
Also this robot Behaves like champak bapuji 🤣🤣 https://t.co/A2SS0fiKvf pic.twitter.com/TbZM31MXKf
— Obstinate_girl8⭐️ (@obstinate_girl8) April 21, 2025
Champak Lal 🤣🤣pic.twitter.com/T1ADQeKGNk
— 𝙕𝙄𝙈𝘽𝙐 😎 (@Zimbu12_) April 21, 2025
हा रोबोट डॉग ‘चंपक’ अगदी अमेरिकेतील प्रसिद्ध रोबोटिक्स कंपनी बोस्टन डायनॅमिक्सने बनवलेल्या कुत्र्यासारखा दिसतो. ही कंपनी मॅसॅच्युसेट्समध्ये आहे आणि तिने बनवलेल्या रोबोटिक डॉग मशीन खूप प्रसिद्ध आहेत. बोस्टन डायनॅमिक्सचे हे चार पायांचे रोबोट विविध कारणांसाठी डिझाइन केलेले आहेत. कधीकधी सैन्यासाठी साहित्य वाहून नेणाऱ्या खेचराच्या टोळीच्या रूपात, तर कधीकधी मानवांसाठी धोकादायक असलेल्या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी.
आयपीएलमध्ये दिसणारा रोबोट कुत्रा देखील बोस्टन डायनॅमिक्सच्या सर्वात लहान आणि गोंडस चार पायांच्या रोबोटसारखा दिसतो. असं वाटतंय की आयपीएलच्या लोकांनी ते त्यापासून प्रेरित होऊन तयार केलं आहे, फक्त त्यात थोडी अधिक मजा आणि मनोरंजन जोडलं गेलं आहे! या रोबोट डॉगचे नामकरण केल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तारक मेहता का उल्टा चश्मामधील चंपक चाचासोबत तुलना करण्यास सुरुवात केली. अनेक मजेदार रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.