Samsung युजर्सना मोठा दिलासा! सप्टेंबरपर्यंत फ्रीमध्ये रिप्लेस होणार स्क्रीन, या स्मार्टफोन्सवर कंपनी देतेय ऑफर
तुम्ही देखील सॅमसंग युजर आहात आणि स्मार्टफोनवरील ग्रीन लाईनच्या समस्येने हैराण झाला आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही सॅमसंगचा गॅलेक्सी एस22 अल्ट्रा किंवा गॅलेक्सी एस 21 सिरीजमधील स्मार्टफोन वापरल असाल आणि तुम्हाला ग्रीन लाईन समस्येचा सामना करावा लागत असेल तर ही बातमी नक्की वाचा. सॅमसंगचा गॅलेक्सी एस22 अल्ट्रा किंवा गॅलेक्सी एस 21 सिरीजमधील ज्या स्मार्टफोन युजर्स ग्रीन लाईन समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. Tarun Vats नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सॅमसंग ग्रीन लाइन समस्येमुळे प्रभावित झालेल्या स्मार्टफोनसाठी मोफत वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट पॉलिसीचा कव्हरेज कालावधी वाढवत आहे. एका टिपस्टरनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस22 अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस21स्मार्टफोन युजर आता सप्टेंबरपर्यंत भारतातील सेवा केंद्रांवर वन-टाइम स्क्रीन बदलण्यासाठी पात्र असतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
Attention ‼️
Spoke to Samsung Support — they’ve extended GREEN LINE FREE SCREEN REPLACEMENT policy till 30th Sept 2025.
S22 Ultra/S21 are eligible, BUT they won’t reveal the full list of supported devices. Come on Samsung, transparency isn’t that hard
REPOST TO HELP pic.twitter.com/knUsyWfH9t
— Tarun Vats (@tarunvats33) April 19, 2025
टिपस्टर तरुण वत्स यांनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. तसेच, सॅमसंग सपोर्टने पुष्टी केली आहे की त्यांचा स्क्रीन रिप्लेसमेंट प्रोग्राम आता Galaxy S22 Ultra आणि Galaxy S21 सिरीजसाठी सप्टेंबर 2025 पर्यंत वैध असेल. यापूर्वी, हे फक्त 31 डिसेंबर 2024 पर्यंत वॉरंटी नसलेल्या गॅलेक्सी मॉडेल्सवर लागू होते. कंपनीचे म्हणणे आहे की या ऑफरमध्ये ऑन-सेल टच AMOLED असेंब्ली बदलणे समाविष्ट असेल. याशिवाय, तंत्रज्ञ मोफत बॅटरी आणि किट बदलण्याची सुविधा देखील देतील. तथापि, यासाठी काही अटी आणि शर्ती देखील असतील.
सॅमसंग सपोर्ट म्हणतो की डिव्हाइसवर कोणतेही भौतिक नुकसान किंवा पाण्याच्या नुकसानाचे चिन्ह नसावेत. खरेदीच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत डिवाइस फ्रीमध्ये पार्ट्स बदलण्यास पात्र असतील. याशिवाय, फक्त पहिल्या खरेदीदारालाच ही मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट मिळू शकते.
स्क्रीन रिप्लेसमेंट पूर्णपणे मोफत असेल परंतु तरीही तुम्हाला काही श्रम शुल्क द्यावे लागेल. जर तुम्हालाही अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता आणि स्क्रीन बदलण्यासाठी तुमच्या जवळच्या सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये अपॉइंटमेंट बुक करू शकता.
ग्रीन लाईनच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सॅमसंगने असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. तसेच एप्रिल 2024 मध्ये, कंपनीने भारतात Samsung Galaxy S20 मालिका, Galaxy Note 20 मालिका, Galaxy S21 मालिका आणि Galaxy S22 साठी एक विशेष रिप्लेसमेंट प्रोग्राम जाहीर केला होता. आता पुन्हा एकदा कंपनीने हा प्रोगाम सुरु केला असून त्याचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे.