Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामाची बातमी! ‘UMANG’ ॲपवर आता मिळणार ‘मेरा राशन’ची सुविधा; रेशन कार्डचे सर्व तपशील एका क्लिकवर उपलब्ध

केंद्र सरकारने उमंग (UMANG) ॲपमध्ये 'मेरा राशन' सेवा सुरू केली आहे. आता रेशन कार्डचे स्टेटस, सदस्यांची माहिती आणि रेशन दुकानाचे लोकेशन मोबाईलवर पाहता येईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 12, 2026 | 06:17 PM
कामाची बातमी! 'UMANG' ॲपवर आता मिळणार 'मेरा राशन'ची सुविधा (Photo Credit- X)

कामाची बातमी! 'UMANG' ॲपवर आता मिळणार 'मेरा राशन'ची सुविधा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • कामची बातमी!
  • ‘UMANG’ ॲपवर आता मिळणार ‘मेरा राशन’ची सुविधा
  • रेशन कार्डचे सर्व तपशील एका क्लिकवर उपलब्ध
डिजिटल इंडिया मोहिमेला अधिक गती देत केंद्र सरकारने (Central Goverment) सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सरकारी सेवांचा लाभ सुलभ व्हावा, या उद्देशाने ‘उमंग’ (UMANG) ॲपमध्ये आता ‘मेरा राशन’ (Mera Ration) हे नवीन फिचर जोडण्यात आले आहे. या सुविधेमुळे रेशन कार्डधारकांना आता कार्यालयांचे चकरा न मारता आपल्या मोबाईलवरच सर्व माहिती पाहता येणार आहे.

रेशन कार्डशी संबंधित कामे आता होणार अधिक सुलभ

रेशन कार्डमधील नाव तपासणे, कुटुंबातील सदस्यांची माहिती अपडेट करणे किंवा जवळच्या स्वस्त धान्य दुकानाचा पत्ता शोधणे, यासाठी आता रेशनिंग ऑफिस किंवा डीलरवर अवलंबून राहण्याची गरज नाही. उमंग ॲपमधील या नवीन सुविधेमुळे पारदर्शकता वाढणार असून, लाभार्थ्यांना त्यांना मिळणाऱ्या धान्याचा अचूक कोटा आणि इतर तांत्रिक माहिती घरबसल्या पाहता येईल.

काय आहे ‘UMANG’ ॲप आणि त्याचे फायदे?

‘उमंग’ (Unified Mobile Application for New-age Governance) हे भारत सरकारचे अधिकृत ॲप आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर केंद्र आणि राज्य सरकारच्या शेकडो सेवा पुरवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. यामध्ये आधीपासूनच आधार, पीएफ (PF), पेन्शन, गॅस बुकिंग, वीज बिल आणि पासपोर्ट यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत. आता त्यात ‘मेरा राशन’चा समावेश झाल्याने रेशन कार्डधारकांसाठी हे ॲप ‘वन-स्टॉप सोल्यूशन’ ठरत आहे.

Telegram ला मोठा दणका! ताबडतोब ‘हा’ कंटेंट हटवा; केंद्र सरकारने दिले निर्देश

‘मेरा राशन’ फिचरची प्रमुख वैशिष्ट्ये

  • स्टेटस चेक: रेशन कार्ड सक्रिय आहे की नाही, हे त्वरित पाहता येईल.
  • सदस्यांची माहिती: कार्डमध्ये किती सदस्यांची नावे आहेत आणि कोणाचे आधार लिंक आहे, हे तपासता येईल.
  • जवळचे रेशन दुकान: तुम्ही ज्या भागात आहात, तिथल्या जवळच्या रेशन दुकानाचे लोकेशन मॅपसह शोधता येईल.
  • पारदर्शकता: रेशन डीलरकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी लाभार्थ्याला त्याच्या हक्काच्या धान्याची माहिती आधीच मोबाईलवर मिळेल.

कसा कराल या सुविधेचा वापर? (स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)

१. नोंदणी करा: सर्वप्रथम तुमच्या Android किंवा iOS फोनमध्ये ‘UMANG App’ डाऊनलोड करा. तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून लॉगिन किंवा रजिस्ट्रेशन करा.

२. सर्च आणि सेवा निवड: लॉगिन झाल्यानंतर ॲपमधील सर्च बारमध्ये “Mera Ration” टाईप करून सर्च करा. त्यानंतर मिळणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.

३. तपशील नोंदवा: तुमचा रेशन कार्ड नंबर किंवा विचारलेली आवश्यक माहिती भरा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर रेशन कार्डचा संपूर्ण डिजिटल गोषवारा दिसेल.

सर्वसामान्यांचा वेळ आणि पैसा वाचणार

डिजिटल साक्षरता वाढत असताना रेशन कार्डाशी संबंधित ही सेवा ऑनलाईन झाल्यामुळे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रांगेत उभे राहून किंवा माहिती अभावी होणारी गैरसोय आता टाळता येईल.

Tech Tips: मोबाईल यूजर्स सावधान! तुम्हीही स्मार्टफोनचे Bluetooth सतत ऑन ठेवता? हॅक होऊ शकते तुमचे डिव्हाईस…

Web Title: Umang app mera ration feature ration card details online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • Central Governement
  • Digital news
  • Ration Card

संबंधित बातम्या

UPSC मुख्य परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू! ‘हा’ फॉर्म न भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही? जाणून घ्या नियम
1

UPSC मुख्य परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू! ‘हा’ फॉर्म न भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही? जाणून घ्या नियम

Supreme Court Lawyer: सर्वोच्च न्यायालयात वकील कसे बनायचे? जाणून घ्या आवश्यक पात्रता एका क्लिकवर…
2

Supreme Court Lawyer: सर्वोच्च न्यायालयात वकील कसे बनायचे? जाणून घ्या आवश्यक पात्रता एका क्लिकवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.