Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राथमिक बँक खात्यातून यूपीआय पेमेंट केल्यास वाढेल डिजिटल फसवणुकीचा धोका; भारती एअरटेलच्या उपाध्यक्षांचे ग्राहकांना पत्र

डिजीटल सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी ग्राहकांना उद्देशून पत्र लिहीले आहे. त्यांनी ग्राहकांना सेफ अकाउंट सुरु करण्याचे आवाहन केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 28, 2025 | 02:18 PM
प्राथमिक बँक खात्यातून यूपीआय पेमेंट केल्यास वाढेल डिजिटल फसवणुकीचा धोका; भारती एअरटेलच्या उपाध्यक्षांचे ग्राहकांना पत्र

प्राथमिक बँक खात्यातून यूपीआय पेमेंट केल्यास वाढेल डिजिटल फसवणुकीचा धोका; भारती एअरटेलच्या उपाध्यक्षांचे ग्राहकांना पत्र

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्राहकांना सेफ अकाउंट सुरु करण्याचे आवाहन
  • भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे ग्राहकांना उद्देशून पत्र
  • एअरटेलकडून राबवल्या जाणा-या आवश्यक उपाययोजनांबद्दल माहिती
भारतात डिजिटल फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या सायबर घटनांना आळा घालण्यासाठी कंपन्या सतत प्रयत्न करत असतात आणि यूजर्सना वेळोवेळी जागृत राहण्यासाठी आवाहन देखील करत असतात. वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल आता भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी चिंता व्यक्त केली आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि अशा प्रकरच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्यांनी ग्राहकांना उद्देशून पत्र लिहीले आहे. या पत्रात एअरटेलकडून राबवल्या जाणा-या आवश्यक उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात आली आहे.

तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या

पार्सल डिलीव्हरीचे बनावट कॉल, फिशिंग लिंक्स आणि डिजिटल अरेस्ट सारख्या वाढत्या घटनांमुळे ग्राहकांवर परिणाम होऊ नये आणि त्यांची सुरक्षा टिकून राहावी यासाठी एअरटेल कटिबद्ध असल्याचे भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी एअरटेल पेमेंट्स बँकेच्या सेफ सेकं अकाउंटची घोषणा देखील केली. हे अकाऊंट ग्राहकांच्या मुख्य बँक अकाऊंटपासून स्वतंत्र ठेवले जाते. सेफ सेकं अकाउंटमुळे डिजिटल पेमेंटसाठी वापरला येणारा पैसा सुरक्षित राहतो आणि कोणत्याही संभाव्य फसवणूकीपासून अतिरिक्त संरक्षण प्रदान केले जाते. ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी सांगितले की, एअरटेल नेटवर्कमध्ये होणारे गुन्हे किंवा फसवणूकीच्या घटना अत्यंत चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांची सुरक्षा टिकून राहावी आणि त्यांना अशा घटनांना बळी पडावे लागू नये, यासाठी कायमस्वरुपी प्राधान्य राहील. एअरटेल कंपनी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून स्पॅम कॉल आणि मेसेजबाबत अलर्ट जारी करते. याशिवाय ग्राहकांनी चुकून एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक केले तर ती लिंक ब्लॉक करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. असे असले तरी देखील जर आपले प्राथमिक बँक अकाऊंट इतर पेमेंट एप्लिकेशनशी जोडल्यास आपल्या बचतीला धोका निर्माण हो शकतो. हेच धोके टाळण्यासाठी ग्राहकांसाठी सेफ सेकंड अकाऊंट हा सुरक्षित आणि अत्यंत सोपा उपाय आहे.

ChatGPT Data Leak: AI प्लॅटफॉर्मवर सायबर हल्ला! लाखो यूजर्सचे नाव आणि ईमेल अ‍ॅड्रेस लीक, कंपनीने दिली वार्निंग

सेफ सेकंड अकाऊंटबद्दल माहिती देताना गोपाळ विठ्ठल यांनी सांगितलं की, मुख्यतः दैनंदिन डिजीटल पेमेंटसाठी सेफ सेकंड अकाऊंट तयार करण्यात आले आहे. या अकाऊंटमध्ये ग्राहक कमी रक्कम ठेऊ शकतात. या शिल्लक रकमेवर ग्राहकांना व्याजही दिले जाते. एअरटेल पेमेंटंस बँकेतून कर्ज किंवा क्रेडिट सुविधा देत नाही. त्यामुळे ग्राहकांना या अकाऊंटमध्ये मोठी रक्कम ठेवण्याची कोणतीही सक्ती नाही. ग्राहक हे अकाऊंट एअरटेल थॅँक्स एप्लिकेशनच्या मदतीने सुरु करू शकतात. यासाठी काही सोपी प्रोसेस आहे. ग्राहकांना एप्लिकेशनमधील पेमेंट बँक या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, आधार आणि पॅन आधारित केव्हायसी पूर्ण करावी लागणार आहे. एमपीन सेट करा, खात्यात थोडी रक्कम जमा करा. या प्रक्रियेनंतर तुम्ही व्यवहार सुरक्षितपणे सुरु करु शकता. ’’

Web Title: Upi payments from primary bank account will increase the risk of digital fraud know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या
1

तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या

Honor Magic 8 Pro: स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि पावरफुल प्रोसेसर… किंमत जाणून घ्या
2

Honor Magic 8 Pro: स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि पावरफुल प्रोसेसर… किंमत जाणून घ्या

Free Fire Max: गेममध्ये मिळणार हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल! क्लेम करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Free Fire Max: गेममध्ये मिळणार हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल! क्लेम करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Apple च्या ‘या’ iPhone वर मिळतोय 10 हजारांपेक्षा जास्तीचा डिस्काउंट; कुठे आहे बेस्ट ऑफर? बातमी वाचाच…
4

Apple च्या ‘या’ iPhone वर मिळतोय 10 हजारांपेक्षा जास्तीचा डिस्काउंट; कुठे आहे बेस्ट ऑफर? बातमी वाचाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.