
आता फीचर फोनवरूनही करता येणार पेमेंट! Jio आणि Bank of Baroda ची भागिदारी यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, नवं अॅप केलं लाँच
iCloud स्कॅमने उडवली iPhone यूजर्सची झोप! अशी होतेय फसवणूक, सावध राहण्यासाठी वाचा एक्सपर्टचा सल्ला
लाँच करण्यात आलेले नवीन bob World Lite अॅप बँक ऑफ बडौदाच्या ग्राहकांसह इतर बँकांच्या ग्राहकांसाठी देखील उपलब्ध असणार आहे. नवीन अॅप वापरण्यासाठी यूजर्सना एक सरळ आणि सोपी प्रोसेस फॉलो करून bob World Lite अॅप JioPhone Prima 4G डिव्हाईसवर इंस्टॉल करावे लागणार आहे. या नव्या अॅपच्या मदतीने यूजर्स यूपीआय-इनेबिल्ड स्कॅन अँड पेसह पैसे पाठवणं, मनी ट्रांसफर, मोबाइल रिचार्ज, बिल पेमेंटसह प्रोफाइल मेनेजमेंट सारख्या सुविधा वापरू शकणार आहेत. या नव्या bob World Lite अॅपमध्ये लवकरच नवे फीचर्स देखील जोडले जाणार आहेत. जियो आणि BoB च्या भागिदारीअंतर्गत bob World Lite अॅप JioPhone Prima 4G डिव्हाईसवर प्री-लोडेड असणार आहे आणि यूजर्सना थेट होम स्क्रीनवर या अॅपचा एक्सेस मिळणार आहे. यूजर्स हे अॅप जियो स्टोअरवरून देखील डाऊनलोड करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
Media Release – Bank of Baroda and Reliance Jio Partner to Launch ‘bob World Lite’ for Feature Phones, Accelerating Digital Inclusion in India The first comprehensive mobile banking solution for feature phones Mumbai, April 13th, 2026: Bank of Baroda and Reliance Jio today… pic.twitter.com/lJQRiJjzQA — Reliance Industries Limited (@RIL_Updates) April 13, 2026
bob World Lite अॅप केवळ बँक ऑफ बडौदा ग्राहकांसाठीच नाही तर इतर बँकेचे ग्राहक देखील JioPhone Prima 4G डिव्हाईसवर या अॅपचा वापर करू शकणार आहेत. हे अॅप विशेषत: फीचर फोन यूजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे आणि लो बँडविड्थ आणि हलक्या आर्किटेक्चरवर आधारित आहे, ज्यामुळे ते फीचर फोन म्हणजेच कीपॅड फोनवर सहजपणे चालवता येते.
बँक ऑफ बडौदाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ देवदत्त चांद यांनी भागिदारीबाबत म्हटलं आहे की, “डिजिटल इन्क्लूजन म्हणजेच आर्थिक समावेशन बँक ऑफ बडौदाच्या प्रमुख गोष्टींपैकी एक आहे. bob वर्ल्ड लाइट लाँच करण्यासाठी जिओसोबत आम्ही भागिदारी केली असून हे पाऊल स्मार्टफोन इकोसिस्टमच्या पलीकडे डिजिटल बँकिंगचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा निर्णय आहे. भारतातील फीचर फोन वापरकर्त्यांची मोठी आणि वाढती संख्या लक्षात घेता, या उपक्रमामुळे सोपे, सुरक्षित आणि केव्हाही बँकिंग करणे शक्य होते, ज्यामुळे डिजिटल दरी कमी होण्यास मदत होते.
घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर
रिलायंस जियो इंफोकॉमचे प्रेसिडेंट सुनील दत्त म्हणाले की, जिओ नेहमीच भारतातील डिजीटल सेवा अधिक सोप्या करण्याच्या दिशेने काम करत असते. बँक ऑफ बडौदासोबत करण्यात आलेली ही भागिदारी भारतातील करोडो लोकांसाठी अफोर्डेबल डिजिटल सेवा पोहोचण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे.