
फोन आणि फ्लशची जोडी ठरत आहे ‘घातक’! नव्या अभ्यासाने उघड केले धक्कादायक सत्य, डॉक्टरांनी दिलाय इशारा
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, टॉयलेटमध्ये जास्त वेळ मोबाईलचा वापर केल्यास पाइल्स (haemorrhoids) सारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हा रिसर्च सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेतील बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरच्या डॉक्टरांनी केले होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, बाथरुममध्ये मोबाईलचा वापर केल्यास लोकं गरजेपेक्षा जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसून राहतात. त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो आणि हळूहळू मूळव्याधासारख्या समस्या उद्भवू लागतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिसर्च टीमने 125 वयस्कर लोकांचा सर्वे करण्यात आला आहे, जो कोलोनोस्कोपी टेस्टसाठी रुग्णालयात आले होते. यामधील अनेक लोकांनी मान्य केले की ते बाथरुममध्ये मोबाईलचा वापर करत होते. निकालांवरून असे दिसून आले की, जे लोकं सहसा बाथरुममध्ये फोनचा वापर करतात, त्यांना फोन न वापरणाऱ्या लोकांपेक्षा मूळव्याध होण्याचा धोका 46 टक्के जास्त असतो.
तज्ज्ञांनी वय, लिंग, फायबरचे सेवन, व्यायाम आणि शरीराचे वजन यासारखे घटक लक्षात घेऊन असा निष्कर्ष काढला आहे की, मोबाईलचा वापर केल्याने टॉयलेटमध्ये बसण्याचा वेळ वाढतो ज्यामुळे या आजारांचा सामना करावा लागू शकतो.
रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुमारे 66 टक्के लोकांनी मान्य केले आहे ते बाथरूममध्ये फोनचा वापर करतात. यामधील 54 टक्के लोकं बातम्या वाचतात, 44 टक्के लोकं सोशल मीडिया स्क्रॉल करतात. अभ्यासावरून असं सिद्ध झालं आहे की, 37 टक्के मोबाइल यूजर्स टॉयलेटमध्ये 5 मिनिटांहून अधिक वेळ घालवतात, तर फोन नसलेल्या लोकांमध्ये ही संख्या फक्त 7 टक्के आहे. जे लोक बाथरूममध्ये फोन घेऊन जातात ते तिथे बसून जवळजवळ पाचपट जास्त वेळ घालवतात.
दिल्लीच्या धरमशिला नारायणा हॉस्पिटलमधील गॅस्ट्रो एंटरोलॉजिस्ट डॉ. महेश गुप्ता यांनी सांगितलं आहे की, बाथरूममध्ये फोन वापरणं ही एक सामान्य सवय बनली आहे, मात्र याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितलं आहे की, शौचालयात जास्त वेळ बसल्याने गुदाशयातील नसांवर सतत दबाव येतो, ज्यामुळे मूळव्याध (पाइल्स) होऊ शकतो. बाथरूममध्ये मोबाईलमुळे लक्ष विचलित होते.
हा अभ्यास केवळ कोणत्याही एका आजारासाठी नाही, तर याचा पुरावा आहे की, आपली डिजिटल लाइफस्टाइल आपल्या आरोग्यावर परिणाम करत आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, लोकांना जागरूक करण्यासाठी आरोग्य मोहिमा राबवल्या पाहिजेत, जेणेकरून लोक बाथरूममध्ये मोबाईल फोनचा वापर कमी करतील आणि वेळ मर्यादित करतील.