Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक स्मार्ट! मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 वरील 16 स्थानकांवर ‘Vi’ची नेटवर्क सेवा उपलब्ध

मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन ३ वर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता मेट्रो प्रवासादरम्यान अखंड मोबाईल नेटवर्क आणि हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव घेणे अधिक सोपे होणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2026 | 02:56 PM
मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक स्मार्ट! मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 वरील 16 स्थानकांवर 'Vi'ची नेटवर्क सेवा उपलब्ध

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक स्मार्ट! मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 वरील 16 स्थानकांवर 'Vi'ची नेटवर्क सेवा उपलब्ध

Follow Us
Follow Us:
  • अ‍ॅक्वा लाईन ३ वरील १६ स्थानकांवर मोबाईल नेटवर्क सेवा पुन्हा सुरू.
  • प्रवाशांना कॉलिंग, इंटरनेट, डिजिटल पेमेंट आणि सोशल मीडिया वापरणे अधिक सुलभ.
  • मेट्रोच्या पुढील टप्प्यातील स्थानकांवरही लवकरच नेटवर्क सेवा विस्तारण्याची तयारी.
वोडाफोन आयडिया (वी) ने मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन ३ च्या मार्गिकेवरील ‘आरे जेवीएलआर’ ते ‘आचार्य अत्रे चौक’ दरम्यानच्या सर्व १६ स्थानकांवर त्यांची मोबाईल नेटवर्क सेवा सुरू झाली असल्याची घोषणा केली आहे. या १६ स्थानकांमध्ये: सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, सीएसएमआय एअरपोर्ट टी२, सहार रोड, सीएसएमआय एअरपोर्ट टी१, सांताक्रूझ, वांद्रे कॉलनी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, धारावी, शितला देवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक आणि वरळी यांचा समावेश आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि एसेस इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील काही न सुटलेल्या वादांमुळे ही नेटवर्क सेवा काही काळासाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती.

टेकप्रेमींसाठी गुड न्यूज! जगातील पहिला फोल्डेबल माउस लाँच, 32 दिवसांची बॅटरी लाईफ; 15 वर्षांपर्यंत खराब होणार नाही

अ‍ॅक्वा लाईन ३ मेट्रोच्या दररोज २९० पेक्षा जास्त फेऱ्यांमध्ये १.५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. ही मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनली आहे. आता ‘वी’ चे ग्राहक सर्व मेट्रो स्थानके, प्लॅटफॉर्म आणि प्रवासाच्या दरम्यान पुन्हा एकदा अखंड नेटवर्क कनेक्टिविटीचा आनंद घेऊ शकतील. प्रवाशांना आता प्रवासात असतानाही व्हॉईस कॉल करणे, हाय-स्पीड इंटरनेट वापरणे, डिजिटल पेमेंट अ‍ॅप्स वापरणे, सोशल मीडियावर कनेक्टेड राहणे आणि आपली कामे सुरू ठेवणे सहज शक्य होईल.

सायन्स सेंटर मेट्रो स्टेशन ते कफ परेड दरम्यानच्या ११ स्थानकांचा समावेश असलेल्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील नेटवर्क उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबईच्या या विस्तारणाऱ्या मेट्रो नेटवर्कमध्ये ग्राहकांना अखंड कनेक्टिविटीचा लाभ घेता यावा यासाठी, आगामी काही आठवड्यांत उर्वरित सर्व मेट्रो मार्गावर आपली सेवा विस्तारण्याचा ‘वी’ चा मानस आहे.

Asus चा पॉवरफुल टॅबलेट लाँच! मीडियाटेक प्रोसेसरसह टेकप्रेमींसाठी खास लेटेस्ट डिव्हाइस, जाणून घ्या वैशिष्ट्य

वोडाफोन आयडियाचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री जगबीर सिंग म्हणाले, “विश्वासार्ह कनेक्टिविटी हा प्रत्येकाच्या रोजच्या प्रवासात एक आवश्यक भाग आहे. मुंबई मेट्रो नेटवर्कच्या अ‍ॅक्वा लाईन ‘फेज १’ वर आमची सेवा उपलब्ध झाली आहे आणि ‘फेज २’ वरील सेवा देखील लवकरच सुरू होईल, याचा आम्हाला खूप आनंद आहे. ग्राहकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी नेटवर्क उपलब्धता मजबूत करण्यासाठी आणि गर्दीच्या शहरी भागांमध्ये अखंड कनेक्टिविटीचा अनुभव देण्यासाठी आम्ही सातत्याने वचनबद्ध आहोत हे यामधून दिसून येते.”

Web Title: Vi launches mobile network services on mumbai metro aqua line 3 all 16 stations connected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • vodafone idea

संबंधित बातम्या

टेकप्रेमींसाठी गुड न्यूज! जगातील पहिला फोल्डेबल माउस लाँच, 32 दिवसांची बॅटरी लाईफ; 15 वर्षांपर्यंत खराब होणार नाही
1

टेकप्रेमींसाठी गुड न्यूज! जगातील पहिला फोल्डेबल माउस लाँच, 32 दिवसांची बॅटरी लाईफ; 15 वर्षांपर्यंत खराब होणार नाही

Asus चा पॉवरफुल टॅबलेट लाँच! मीडियाटेक प्रोसेसरसह टेकप्रेमींसाठी खास लेटेस्ट डिव्हाइस, जाणून घ्या वैशिष्ट्य
2

Asus चा पॉवरफुल टॅबलेट लाँच! मीडियाटेक प्रोसेसरसह टेकप्रेमींसाठी खास लेटेस्ट डिव्हाइस, जाणून घ्या वैशिष्ट्य

सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करता? तुमची एक चूक सायबर गुन्हेगारांना देऊ शकते आमंत्रण; पोलिसांचा गंभीर इशारा
3

सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करता? तुमची एक चूक सायबर गुन्हेगारांना देऊ शकते आमंत्रण; पोलिसांचा गंभीर इशारा

AI क्रांती की संकट? मशीन्सवरचं मानवी नियंत्रण संपणार? तज्ज्ञांच्या इशाऱ्याने जगभरात वाढली चिंता
4

AI क्रांती की संकट? मशीन्सवरचं मानवी नियंत्रण संपणार? तज्ज्ञांच्या इशाऱ्याने जगभरात वाढली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.