(फोटो सौजन्य: The Verge)
लोकप्रिय ब्रँड Logitech ने बाजारात जगातील पहिलाच फोल्डेबल माउस Mobi Fold लाँच केला आहे. याची किंमत $79.99 (साधारण 7600 रुपये) असल्याचे सांगण्यात येत आहे. या माऊसची खासियत म्हणजे हा एक वायरलेस फोल्डेबल माउस आहे, ज्याला तुम्ही सहज कुठेही घेऊन जाऊ शकता. हा माउस मधोमध फोल्ड होत असल्याने तुमच्या पँटच्या पाॅकेटमध्येही तो कॅरी करता येईल. जे लोक दररोज प्रवास करतात आणि ज्यांना आपल्या बॅगमध्ये माउस कॅरी करावा लागतो त्यांच्यासाठी हा नवीन फोल्डेबल माउस एक चांगला पर्याय ठरेल.
या माउसमध्ये हिंज मॅकॅनिजम बसवण्यात आले आहे, ज्यामुळे त्याचे रूपांतर एका कॉम्पॅक्ट ६६x२१ मिमी ब्लॉकपासून एका पूर्ण-आकाराच्या माउसमध्ये होते, जो सहजपणे कुठेही नेता येतो. लाॅजिकेट कंपनीचे म्हणणे आहे की, जेव्हा हा माउस पूर्ण ओपन केला जातो तेव्हा ट्रॅकपॅड वापरण्याच्या तुलनेत हाताच्या पुढच्या भागावरील ताण कमी होण्यास मदत होते आणि त्यानंतर तो सहजपणे दुमडून खिशात ठेवता येतो.
मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, ‘या’ ठिकाणाची केली निवड
या फोल्डेबल माउसमध्ये ऑटोमॅटीम सीस्टीम बसवण्यात आली आहे ज्यामुळे त्याला ओपन करताच माउस चालू होतो तर फोल्ड करताच माउस बंद होतो. माउसचे बाह्य आवरण धूळ-प्रतिरोधक सिलिकॉन स्लीव्हने झाकलेले आहे आणि कंपनीचा दावा आहे की १५ वर्षे दररोज उघडून बंद केल्यानंतरही हिंजचे कोणतेही नुकसान होणार नाही. या माउसचे वजन 79 गॅम इतके आहे. त्याचबरोबर यात 4,000 DPI PixArt PAW3222 ऑप्टिकल सेंसरचाही वापर करण्यात आला आहे. नेव्हिगेशनसाठी यात टच पॅनेल आहे जो लाईन-बाय-लाईन रिडिंग आणि जलद इनर्शियल स्क्रोलिंग या दोन्हीसाठी अॅडॅप्टिव्ह स्क्रोलिंगला सपोर्ट करते. या टच एरियामध्ये दोन प्रोग्रामेबल बटन्स देखील लावण्यात आले आहेत ज्यांना Logi Options+ सॉफ्टवेयअरच्या मदतीने कस्टमाईज करता येऊ शकतात.






