Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education Technology: शिक्षण क्षेत्रात AI ची क्रांती! ViewSonic ने सादर केले 4K इंटरएक्टिव्ह ViewBoard डिस्प्ले

व्हिज्युअल आणि एडटेक सोल्यूशन्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ViewSonic ने भारतात नवीन AI-संचालित IN05 ViewBoard सीरिज लॉन्च केली आहे. IN6505-N, IN7505-N आणि IN8605-N या 4K EDLA इंटरएक्टिव्ह डिस्प्ले मॉडेल्समध्ये ‘Ask AI’ आणि ‘Video Pilot’ सारखी प्रगत AI-आधारित अध्यापन साधने देण्यात आली आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 02, 2026 | 06:05 PM
व्ह्यूसॉनिकने सादर केली नवीन आयएन०५ सीरिज

व्ह्यूसॉनिकने सादर केली नवीन आयएन०५ सीरिज

Follow Us
Follow Us:

व्ह्यूसॉनिकने सादर केली नवीन आयएन०५ सीरिज
वर्गात शिकवणे होणार सोपे
स्मार्ट क्लासरूमसाठी नवे तंत्रज्ञान

मुंबई: व्हिज्युअल आणि एडटेक सोल्यूशन्स क्षेत्रातील अग्रगण्य जागतिक कंपनी ‘व्ह्यूसॉनिक कॉर्पोरेशन’ने भारतात नवीन एआय-संचालित आयएन ०५ सीरिज व्ह्यूबोर्ड — आयएन६५०५-एन (६५), आयएन७५०५-एन (७५), आणि आयएन८६०५-एन (८६) चे अनावरण केले आहे. आधुनिक वर्गखोल्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी डिझाइन केलेले हे प्रीमियम ४के ईडीएलए इंटरएक्टिव्ह डिस्प्ले प्रगत एआय अध्यापन आणि सहकार्य साधनांना (क्लासरूम टूल्स) शक्तिशाली कामगिरीशी जोडतात, जेणेकरून अधिक स्मार्ट, सोपे आणि अत्यंत आकर्षक शिक्षण अनुभव सादर करताा येतील.

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स

नवीन एआय-संचालित आयएन०५ सीरिज व्ह्यूबोर्डमध्ये वर्गखोलीसाठी विशेषतः विकसित केलेल्या एआय-आधारित टूल्सचा एक सर्वसमावेशक संच समाविष्ट आहे, जो अध्यापन अधिक कार्यक्षम बनवण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठीचा शिक्षण अनुभव समृद्ध आणि मनोरंजक करतो. या अंतर्गत मिळणाऱ्या ‘स्मार्ट शिक्षण सहायते’मध्ये ‘आस्क एआय’ हे एका शक्तिशाली व्हॉईस असिस्टंटप्रमाणे काम करते; ज्याच्या मदतीने शिक्षक व्हॉईस कमांड्स, स्मार्ट पेन व्हॉईस कॅप्चर किंवा कीबोर्ड इनपुटद्वारे व्ह्यूबोर्डवरील फायली उघडणे, आकृत्या काढणे, सेटिंग्ज बदलणे किंवा पेनचे रंग बदलणे यांसारख्या गोष्टी सहज करू शकतात. तसेच, यातील ‘व्हिडिओ पायलट’ हे टूल स्वयंचलितपणे संरचित सारांश, टाइमस्टँप केलेले सबटायटल्स आणि क्लिक करण्यायोग्य नेव्हिगेशन पॉइंट्स तयार करून व्हिडिओ-आधारित शिक्षणाला अधिक प्रगत बनवते.

वर्गातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी यात ‘एआय पेंटर’ समाविष्ट आहे, जो व्हॉईस, पेन किंवा टेक्स्ट इनपुटद्वारे इंटेलिजेंट ड्रॉइंग असिस्टन्स देतो, तर ‘एआय माइंड मॅप’ केवळ कीवर्ड, विषय किंवा चित्रांवरून त्वरित संरचित माइंड मॅप्स तयार करतो. हे दोन्ही टूल्स एकत्रितपणे ब्रेनस्टॉर्मिंग आणि लेसन प्लॅनिंग अधिक परस्परसंवादी करतात. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांचे आकलन जलद आणि सुलभ करण्यासाठी यात ‘त्वरित सहाय्यक शिक्षण आणि समस्या निवारण’ टूल्स देण्यात आले आहेत. यामध्ये ‘सर्कल गो’मुळे कोणत्याही प्रश्नाभोवती वर्तुळ काढून त्याचे टप्प्याटप्प्याने उत्तर आणि संबंधित माहिती त्वरित मिळवता येते. सोबतच, ‘कॅल्क्युलेटर प्रो’ हस्तलिखित समीकरणे आणि भूमितीय गणना नैसर्गिकरीत्या सोडवण्यास मदत करतो, तर ‘लाइव्ह सबटायटल’ स्थानिक आणि ऑनलाईन दोन्ही व्हिडिओंसाठी रिअल-टाइम बहुभाषिक सबटायटल्स आणि भाषांतर उपलब्ध करून देतो.

“एआय-संचालित आयएन०५ सीरिज हे अधिक स्मार्ट आणि जोडलेले (कनेक्टेड) शैक्षणिक वातावरण तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे,” व्ह्यूसॉनिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री मुनीर अहमद म्हणाले. “एआय-संचालित क्लासरूम टूल्सना सुलभ सहकार्य क्षमता आणि उच्च-कार्यक्षमता असलेल्या इंटरएक्टिव्ह डिस्प्लेसोबत जोडून, शिक्षकांना अधिक आकर्षक आणि प्रभावी शिक्षण अनुभव प्रदान करण्यात मदत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

हे एआय-आधारित नाविन्यपूर्ण शोध व्ह्यूसॉनिकच्या नामांकित ‘मायव्ह्यूबोर्ड’ इकोसिस्टमसोबत अखंडपणे काम करतात, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने एक इंटेलिजेंट शिक्षण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी ‘नोट’ आणि ‘मायव्ह्यूबोर्ड व्हाईटबोर्ड’ सॉफ्टवेअरचा समावेश आहे.

शैक्षणिक वातावरणासाठी तयार केलेल्या या नवीन आयएन सीरिज मॉडेल्समध्ये अल्ट्रा-हाय-डेफिनिशन ४के रिझोल्यूशन (३८४० x २१६०), ऑक्टा-कोर प्रोसेसर, ८जीबी रॅम, १२८जीबी स्टोरेज आणि अँड्रॉइड १६ (ईडीएलए) समाविष्ट आहे. ते सिंगल-केबल पॉवर, डेटा आणि डिस्प्लेसाठी अखंड यूएसबी-सी कनेक्टिव्हिटीसह ५० पॉइंट्सपर्यंतच्या टचला आणि अचूक पेन इनपुटला सपोर्ट करणारे प्रगत इन्फ्रारेड टच तंत्रज्ञान देखील प्रदान करतात.

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

एआय-संचालित आयएन०५ सीरिज व्ह्यूबोर्ड ब्राइट ४००-निट पॅनल्स, ५०००:१ कॉन्ट्रास्ट रेशो आणि अँटी-ग्लेअर एजी ग्लाससह उत्कृष्ट व्हिज्युअल परफॉर्मन्स देतो. दीर्घायुष्य आणि सहकार्यासाठी तयार केलेले हे डिस्प्ले २०डब्ल्यू x २ स्पीकर्स, स्मार्ट वैशिष्ट्यांसह मल्टिपल यूएसबी पोर्ट्स आणि एचडीएमआय २.० सह सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटी आणि मजबूत नेटवर्क क्षमतांना सपोर्ट करतात. याशिवाय लो ब्लू लाईट सर्टिफिकेशन, ऊर्जा-कार्यक्षम कार्यप्रणाली आणि वेसा-सुसंगत माउंटिंग ही याची अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत.

Web Title: Viewsonic launches ai powered in05 viewboard series in india news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • ai
  • education
  • technology

संबंधित बातम्या

AI Career Scope: AI जगतात मोठी उलथापालथ! या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काय आहे उत्तम पर्याय?
1

AI Career Scope: AI जगतात मोठी उलथापालथ! या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काय आहे उत्तम पर्याय?

School Fees: उच्च शिक्षणापेक्षा शाळेची फी जास्त वेगाने वाढतेय का? जाणून घ्या शिक्षणाच्या वाढत्या खर्चाची धक्कादायक आकडेवारी..
2

School Fees: उच्च शिक्षणापेक्षा शाळेची फी जास्त वेगाने वाढतेय का? जाणून घ्या शिक्षणाच्या वाढत्या खर्चाची धक्कादायक आकडेवारी..

AI Startup Program: आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे का? मग ही बातमी लगेच वाचा..
3

AI Startup Program: आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे का? मग ही बातमी लगेच वाचा..

NTA Structure Reforms: पेपर लीकच्या विळख्यात अडकलेली एनटीए कशी काम करते? वाचा एका क्लिकवर..
4

NTA Structure Reforms: पेपर लीकच्या विळख्यात अडकलेली एनटीए कशी काम करते? वाचा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.