नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग... फॉलो करा या स्टेप्स
स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत
भारत संचार निगम लिमिटेडने सुरु केलेली ही सर्विस देशभरातील सर्व टेलीकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. यासाठी यूजर्सना त्यांच्या फोनच्या सेटिंगमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. या बदलानंतर यूजर्स नेटवर्क नसताना देखील कॉलिंगच्या सुविधेचा फायदा घेऊ शकणार आहे. फोनमधील सेटिंग ऑन केल्यानंतर यूजर्स त्यांच्या फोनवर कॉल आणि मेसेज रिसीव्ह करू शकणार आहेत. तसेच यूजर्स त्यांच्या फोनवरून कॉल देखील करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
बीएसएनएलची ही सर्विस वॉइस ओवर वाय-फाय (VoWiFi) आहे. यामध्ये यूजर्सना त्यांच्या फोनमध्ये मोबाईल नेटवर्क नसले तरी देखील कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. पण यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहेस की, फोन वाय-फाय नेटवर्कला कनेक्ट असणं गरजेचं आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया अनेक वर्षांपासून आपल्या यूजर्सना ही सेवा देत आहेत. बीएसएनएलने या वर्षाच्या सुरुवातीला ही सेवा सुरू केली. बीएसएनएलची व्हीओवायफाय सेवा सुरू करणे खूप सोपे आहे. तुम्ही तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर ती सहजपणे सुरू करू शकता. कंपनीने गेल्यावर्षी सुमारे 1 लाख नवीन 4G/5G मोबाईल टॉवर संपूर्ण देशभरात लावले आहेत. हे मोबाईल टॉवर्स सरकारी टेलीकॉम ऑपरेटरचे नेटवर्क इंफ्रास्ट्रक्टर सुधारण्यासाठी लावण्यात आले आहेत.
बीएसएनएल व्हीओवायफाय सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे बीएसएनएल 5G रेडी सिम कार्ड असं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे बीएसएनएलचे जुने सिमकार्ड असेल तर ते त्वरित बदला आणि 4G/5G सिम कार्ड खरेदी करा. यासाठी तुम्हाला कोणतेही जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
Ans: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारत सरकारच्या मालकीची दूरसंचार कंपनी आहे.
Ans: BSNL मोबाईल नेटवर्क, ब्रॉडबँड, फायबर इंटरनेट, लँडलाइन आणि एंटरप्राइझ कम्युनिकेशन सेवा पुरवते.
Ans: BSNL देशभरात 4G सेवा विस्तारत आहे आणि 5G सेवांवरही काम करत आहे.






