Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर
नियमांनुसार, पूर्वी फक्त महिलाच विषमलिंगी जोडीदारांसोबत चॅट सुरू करू शकत होत्या. याचा उद्देश महिलांना डेटिंगवर जास्त कंट्रोल देणे आणि वायफळ मेसेजपासून सुरक्षा करणे असा होता. मात्र आता कंपनीने या नियमात बदल केला आहे. कंपनीच असं म्हणणं आहे की, कॅनडामध्ये या फिचरच्या चाचणीदरम्यान चॅट सुरू करण्याचे प्रमाण वाढले आहे. याव्यतिरिक्त, कमी मॅच कालबाह्य झाले आणि पूर्वीच्या तुलनेत जास्त चॅट दोन्ही बाजूने सुरू झाले. (फोटो सौजन्य: Pinterest)
बंबलने केवळ पहिला मेसेज कोण करू शकते, याच नियमांत बदल केला नाही तर कंपनीने मॅचनंतर उत्तर देण्याची टाईम लिमिट देखील वाढवली आहे. आता यूजर्सना उत्तर देण्यासाठी 24 तासांचा नाही तर 72 तासांचा वेळ दिला जाणार आहे. उत्तर देण्याची वेळ केवळ 24 तास असल्यामुळेच काही मॅच चॅट सुरु होण्यापूर्वीच गायब होतात. अशाा मॅचची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
बंबलचे फाऊंडर आणि सिईओ व्हिटनी वुल्फ हर्ड यांचं असं म्हणणं आहे की, यूजर्सना जास्त फ्लेक्सिबिलिटी, कमी दबाव आणि खरे कनेक्शन बनवण्याच्या जास्त संधी पाहिजे आहेत. यूजर्सच्या याच मागण्या लक्षात घेऊन कंपनीने हे निर्णय घेतले आहेत.
सध्या डेटिंग ॲप्सना यूजर्सच्या घटत्या स्वारस्याचा आणि पारंपारिक ‘स्वाइप-आधारित’ पद्धतीबद्दल वाढत्या कंटाळ्याचा सामना करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत बंबलने हा मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बंबल’ आणि ‘टिंडर’ यांची मूळ कंपनी असलेल्या ‘मॅच ग्रुप’सह अनेक कंपन्या आता यूजर्सचा सहभाग वाढवण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये आणि एआय साधने समाविष्ट करत आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे आता यूजर्सची संख्या वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



