Vivo उडवणार सर्वांची झोप, लवकरच घेऊन येणार पावरफुल स्मार्टफोन! बजेट किंमतीत मिळणार हे स्पेशल फीचर्स
स्मार्टफोन कंपनी Vivo लवकरच त्यांचं नवीन डिव्हाईस बाजारात घेऊन येणार आहे. Vivo चा हा आगामी स्मार्टफोन बाजारात लाँच होताच इतर कंपन्यांची झोप उडणार, यात काही शंकाच नाही. स्मार्टफोन कंपनी लवकरच त्यांचा आगामी स्मार्टफोन Vivo T4 5G भारतात लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आली नसली. तरी एका टीपस्टारने दिलेल्या माहितीनुसार, आगामी स्मार्टफोन एप्रिल महिन्यात भारतात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनबाबत काही लिक्स समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी Vivo T4 5G स्मार्टफोन कंपीनच्या Vivo T3 5G स्मार्टफोनची जागा घेणार आहे. 2024 मध्ये Vivo T3 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. आता कंपनी या स्मार्टफोनचं अपग्रेड वर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Vivo T4 5G स्मार्टफोनबाबत कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप शेअर केलेली नाही. पण मुकूल शर्मा (stufflistings) या एक्स अकाऊंटवर आगामी स्मार्टफोनबाबत काही माहिती शेअर करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
आगामी Vivo फोनबद्दल असे म्हटले जात आहे की तो Qualcomm च्या मिड-रेंज प्रोसेसर Snapdragon 7s Gen 3 सह बाजारात लाँच केला जाईल. यासोबतच, फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग आणि 7300mAh ची शक्तिशाली बॅटरी दिली जाईल. यासोबतच, जर आपण किंमतीबद्दल बोललो तर, ते 20,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी स्मार्टफोन एका बजेट रेंजमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
योगेश ब्रार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती दिली आहे की, Vivo T4 5G स्मार्टफोन एप्रिलमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. कंपनी लवकरच या आगामी स्मार्टफोनच्या लाँच डेटबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही. किंमतीबाबत, पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की तो 20 हजार ते 25 हजार रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात लाँच केला जाऊ शकतो.
Vivo T4 5G
– 6.67″ Quad curved Display, 120Hz
– Snapdragon 7s Gen 3
– 50MP Sony camera
– 7,300mAh batteryPrice: Rs 20-30k
via: 91Mobiles
Thoughts?
— Yogesh Brar (@heyitsyogesh) March 24, 2025
Vivo T4 5G स्मार्टफोन 8 GB आणि 12 GB रॅम पर्यायांसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या दोन रॅम पर्यायांसह, हा विवो फोन तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB यांचा समावेश आहे. विवोने गेल्या वर्षी 8GB रॅमसह 19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत Vivo T3 5G स्मार्टफोन लाँच केला होता. आगामी स्मार्टफोनची किंमत याच रेंजमध्ये ठेवली जाईल अशी शक्यता आहे.
Vivo T4 5G स्मार्टफोन T4 च्या तुलनेत अपग्रेडेड फीचर्ससह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ AMOLED क्वाड-कर्व्हड डिस्प्ले असू शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा Vivo फोन Qualcomm च्या Snapdragon 7s Gen 3 चिपसेटने सुसज्ज असेल.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, येणाऱ्या Vivo T4 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. या फोनचा प्रायमरी सेन्सर 50 MP Sony IMX882 असेल, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करेल. या फोनमधील सेकंडरी कॅमेरा सेन्सर 2 MP असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32 MP फ्रंट कॅमेरा सेन्सर असेल.
Vivo T4 5G स्मार्टफोनमध्ये मोठी 7300mAh बॅटरी असेल, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. विवोचा हा आगामी फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयपी ब्लास्टर फीचरसह लाँच केला जाईल.