Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेक बाजारात नवा धमाका! 200MP कॅमेऱ्यासह Vivo X Fold 6 चीनमध्ये दाखल; प्रीमियम लूकने वेधलं यूजर्सचं लक्ष

Vivo X Fold 6 Launched: विवोने चीनमध्ये आपला नवीन प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 6 लाँच केला आहे. 200MP कॅमेरा, 7,000mAh बॅटरी आणि 8.02-इंच फोल्डेबल अमोलेड डिस्प्लेमुळे हा फोन चर्चेत आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2026 | 02:13 PM
टेक बाजारात नवा धमाका! 200MP कॅमेऱ्यासह Vivo X Fold 6 चीनमध्ये दाखल; प्रीमियम लूकने वेधलं यूजर्सचं लक्ष

टेक बाजारात नवा धमाका! 200MP कॅमेऱ्यासह Vivo X Fold 6 चीनमध्ये दाखल; प्रीमियम लूकने वेधलं यूजर्सचं लक्ष

Follow Us
Follow Us:
  • फोनमध्ये Zeiss-ट्यून केलेला 200MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोन 80W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
  • 8.02-इंच 120Hz अमोलेड डिस्प्ले आणि डाइमेंसिटी 9500 चिपसेटची साथ मिळते.
Vivo Smartphone Launched: चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये टेक कंपनी विवाने नवीन फोल्डेबल फोन लाँच केला आहे. Vivo X सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेला नवीन Vivo X Fold 6 अतिशय स्टायलिश आणि आकर्षक डिझाईनसह उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन कंपनीचा लेटेस्ट बुक-स्टाइल फोल्डेबल फोन आहे, ज्यामध्ये एक सर्कुलर रियर कॅमेरा मॉड्यूल देण्यात आले आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

Vatpournima 2026 : यंदाच्या वटपौर्णिमेला फोटोशूटची गरज नाही! Gemini AI ने तयार करा स्टायलिश फोटो; वापरा ‘हे’ व्हायरल प्रॉम्प्ट्स

विवो एक्स फोल्ड 6 ची किंमत आणि उपलब्धता

नव्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,999 म्हणजेच सुमारे 1,11,000 रुपये आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 8,999 म्हणजेच सुमारे 1,25,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 9,999 म्हणजेच सुमारे 1,39,000 रुपये आहे.  (फोटो सौजन्य – X) 

याव्यतिरिक्त स्मार्टफोनच्या 16GB + 1TB या टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलची किंमत CNY 10,999म्हणजेच सुमारे 1,53,000 रुपये आहे. स्मार्टफोनचे एक खास ब्लॅक गोल्ड एडीशन देखील सादर करण्यात आले आहे, ज्याची किंमत CNY 11,299 म्हणजेच सुमारे 1,57,000 रुपये आहे. फोनची विक्री 1 जूलैपासून विवोच्या ऑनलाईन स्टोअरवर चीनमध्ये सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लू होल, पोलर नाइट आणि साल्ट लेक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात.

विवो एक्स फोल्ड 6 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

डुअल-सिम फोल्डेबल फोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 फोल्डवर चालतो. या हँडसेटमध्ये सॅमसंग M14 लुमिनेसेंट मटेरियलवाला 8.02-इंच (2,504 x 2,312 पिक्सेल) चा फोल्डेबल अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 424 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 1.07 अरब कलर्स, 100% डीसीआय-P3 कलर गॅमट, 300Hz टच सँपलिंग रेट आणि HDR कंटेंटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये बाहेरील बाजूला 6.51-इंच (1,120 x 2,528 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले आहे, जो फोल्डेबल स्क्रीन सारखेच सर्व फीचर्स ऑफर करतो. कंपनीने दावा केला आहे की, धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनला IP58 आणि IP59 ची रेटिंग मिळाली आहे.

प्रोसेसर

डिव्हाईसल पावर देण्यासाठी यामध्ये 3nm वाला ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 9500 सुपर चिपसेट दिला आहे, ज्यामध्ये 2.7GHz वर क्लॉक करण्यात आलेले चार एफिशिएंसी कोर, 3.5GHz वर क्लॉक करण्यात आलेले तीन परफॉर्मेंस कोर आणि 4.21GHz ची पीक क्लॉक स्पीड देणारा एक प्राइम कोर समाविष्ट आहे. या डिव्हाईसमध्ये एआरएम माली जी1-अल्ट्रा जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 इनबिल्ट स्टोरेज आहे. सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीचा अनुभव आणखी दमदार व्हावा यासाठी नव्या विवो फोल्ड फोनमध्ये Zeiss-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये ओआयएस सपोर्टसह 200-मेगापिक्सेलचा (f/1.68) चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.05) चा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 100x डिजिटल झूम सपोर्ट करणार 50-मेगापिक्सेल (f/2.57) चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. फोनमध्ये आतील स्क्रीन आणि कव्हर डिस्प्ले या दोन्ही सेल्फीसाठी दोन 20-मेगापिक्सेल (f/2.4) चे कॅमेरे दिले आहेत. हे डिव्हाईस 8K पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी सक्षम आहे.

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

बॅटरी

विवो एक्स फोल्ड 6 मध्ये 80W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G एलटीई, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, बायडू, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि भारताच्या NavIC ला सपोर्ट करतात. फोनमध्ये ग्रेविटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, जायरोस्कोप, ई-कंपास आणि इंफ्रारेड (IR) ब्लास्टर सारखे महत्त्वाचे सेंसर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनचे वजन सुमारे 228 ग्रॅम आहे.

Web Title: Vivo x fold 6 launched in china with 200mp camera and premium look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती
1

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
3

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत
4

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.