Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo X300 vs OnePlus 15: तुम्ही कोणाची निवड करणार? एकीकडे ढासू कॅमेरा, दुसरीकडे दमदार बॅटरी! तुमच्यासाठी योग्य कोण?

Vivo X300 खरेदी करावा की OnePlus 15 ला प्राधान्य द्यावं, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. विवो स्मार्टफोनमध्ये परफॉर्मससाठी MediaTek Dimensity 9500 चिपसेट तर वनप्लस स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 08, 2025 | 10:32 PM
Vivo X300 vs OnePlus 15: तुम्ही कोणाची निवड करणार? एकीकडे ढासू कॅमेरा, दुसरीकडे दमदार बॅटरी! तुमच्यासाठी योग्य कोण?

Vivo X300 vs OnePlus 15: तुम्ही कोणाची निवड करणार? एकीकडे ढासू कॅमेरा, दुसरीकडे दमदार बॅटरी! तुमच्यासाठी योग्य कोण?

Follow Us
Close
Follow Us:
  • Vivo X300 मध्ये 6.31-इंच AMOLED डिस्प्ले
  • वनप्लस स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर
  • फोटोग्राफी लवर्ससाठी Vivo X300 स्मार्टफोन उत्तम ऑप्शन
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला Vivo X300 सीरीजची धमाकेदार एंट्री झाली आहे. वीवोची V-सीरीज त्यांच्या कॅमेऱ्या फीचर्ससाठी ओळखली जात आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9500 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर दुसरीकडे OnePlus 15 स्मार्टफोन देखील याच सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला. हा फोन प्रीमियम फीचर्स, हाय-एंड प्रोसेसिंग आणि एडवांस फोटोग्राफी फीचर्स ऑफर करतो. दोन्ही स्मार्टफोन त्यांच्या फीचर्ससाठी परफेक्ट आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या दोन्ही फोनमध्ये गोंधळलेले असाल, तर आम्ही त्यांची फीचर्सच्या बाबतीत तुलना करत आहोत, ज्यामुळे तुमचा गोंधळ दूर होणार आहे.

Flipkart-Amazon Sale 2025: ही संधी चुकली तर पश्चाताप कराल! Smart TV च्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध, मोठ्या ब्रँड्सचा समावेश

डिझाईन आणि डिस्प्ले

लेटेस्ट Vivo X300 मध्ये 6.31-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजॉल्यूशन 1216×2640 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्ले HDR सपोर्ट देखील ऑफर करतो. तर OnePlus 15 मध्ये 6.78-इंच QHD+ AMOLED आहे, जो 165Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट ऑफर करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

परफॉर्मंस आणि हार्डवेयर स्पेक्स

विवोच्या स्मार्टफोनमध्ये परफॉर्मससाठी MediaTek Dimensity 9500 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला 16GB LPDDR5x रॅम आणि 512GB UFS 4.1 स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी आणि इमेजिंग परफॉर्मेंस इनहान्स करण्यासाठी VS1 आणि V3+ चिप दिली आहे. फोन OriginOS 6 वाल्या Android 16 वर आधारित आहे. तर वनप्लस स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर, Adreno 840 GPU, 16GB LPDDR5X Ultra+ रॅम आणि 512GB UFS 4.1 स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 16 वर बेस्ड OxygenOS 16 वर चालतो.

कॅमेरा

Vivo X300 स्मार्टफोन फोटोग्राफी लवर्ससाठी एक उत्तम ऑप्शन ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ZEISS ब्रांडिंगवाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. याचा मुख्य कॅमेरा 200MP (OIS) आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 50MP चा वाइड-अँगल आणि 50MP चा टेलीफोटो लेंस (3x जूम) देण्यात आले आहे. सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये 50MP कॅमेरा आहे. OnePlus 15 स्मार्टफोनमध्ये तीन 50MP कॅमेरे देण्यात आले आहेत (Sony IMX906 मेन सेंसर + Samsung JN5 टेलीफोटो 3.5x झूम + OV50D अल्ट्रावाइड). या स्मार्टफोनची खासियत व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. हा डिव्हाईस 8K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. याचा फ्रंट कॅमेरा 32MP चा आहे जो 4K 60fps व्हिडीओला सपोर्ट करतो.

बटरी आणि चार्जिंग

OnePlus 15 मध्ये 7,300mAh ची मोठी सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली आहे, जी कदाचितच दुसऱ्या फ्लॅगशिपमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन 120W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. डिव्हाईस केवळ 39 मिनिटांत फुल चार्ज करू शकतो. Vivo X300 मध्ये 6,040mAh बॅटरी दिली आहे, जी 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. OnePlus च्या तुलनेत ही बॅटरी छोटी आहे.

कनेक्टिविटी आणि मजबूती

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5G, वाय-फाय, ब्लूटूथ 6 आणि NFC सारखे फीचर्स देण्यात आले आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये सुरक्षेसाठी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर आहे. OnePlus 15 जास्त रफ-एंड-टफ आहे. यामध्ये IP66+IP68+IP69+IP69K रेटिंग आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन पाणी आणि धुळीपासून अधिक सुरक्षित आहे. तसेच Vivo X300 मध्ये IP68/IP69 रेटिंग आहे.

Tech Tips: तुमच्या आधारवर किती सिम अ‍ॅक्टिव्ह? सरकारी पोर्टलवरून असे करा Verification, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

किती आहे स्मार्टफोनची किंमत?

Vivo X300 च्या 12GB+256GB व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 75,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या डिव्हाईसची विक्री 10 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. OnePlus 15 च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 72,999 रुपये आहे.

कोणत्या स्मार्टफोनची निवड कराल?

ज्यांना फोटोग्रीफासाठी स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, असे लोकं Vivo X300 ची निवड करू शकतात. ज्यांना गेमिंग, व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि रफ-एंड-टफ स्मार्टफोन पाहिजे आहे, असे लोकं OnePlus 15 ची निवड करू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo X300 आणि OnePlus 15 मध्ये मुख्य फरक काय आहे?

    Ans: Vivo X300 हे कॅमेरासाठी ओळखले जाते, तर OnePlus 15 परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर अनुभवासाठी फेमस आहे.

  • Que: कोणत्या फोनचा कॅमेरा जास्त चांगला आहे?

    Ans: Vivo X300 मध्ये IMX flagship सेंसरसह झूम आणि नाईट फोटोग्राफी जास्त जबरदस्त मिळते.

  • Que: गेमिंगसाठी कोणता फोन चांगला?

    Ans: OnePlus 15 मध्ये ऑप्टिमाइज्ड OxygenOS आणि स्मूथ परफॉर्मन्स असल्यामुळे गेमिंगमध्ये तो जास्त बेस्ट ठरतो.

Web Title: Vivo x300 vs oneplus 15 which is right for you know features of both tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 10:32 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

OnePlus 15R: तो लवकरच येतोय… टेक लवर्सना मिळणार आनंदाचा धक्का! भारतात आगमन होण्यापूर्वीच उघड झाले फीचर्स
1

OnePlus 15R: तो लवकरच येतोय… टेक लवर्सना मिळणार आनंदाचा धक्का! भारतात आगमन होण्यापूर्वीच उघड झाले फीचर्स

2026 मध्ये बजेट फोनही महागणार! ‘या’ कारणांमुळे Smartphone च्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता
2

2026 मध्ये बजेट फोनही महागणार! ‘या’ कारणांमुळे Smartphone च्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता

OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी
3

OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी

Poco C85 5G: काऊंटडाऊन झाला सुरू! या दिवशी भारतात होणार तगड्या स्मार्टफोनची एंट्री, बॅटरी आणि कॅमेरा एकदम टॉप
4

Poco C85 5G: काऊंटडाऊन झाला सुरू! या दिवशी भारतात होणार तगड्या स्मार्टफोनची एंट्री, बॅटरी आणि कॅमेरा एकदम टॉप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.