Vivo च्या नव्या स्मार्टफोनची होम मार्केटमध्ये एंट्री, 7300mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज! इतकी आहे किंमत
स्मार्टफोन कंपनी Vivo ने त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन होम मार्केटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे Y300 लाइनअपचे नवीन मॉडेल आहे. कंपनीने त्यांच्या या सिरीजमध्ये आणखी एक स्मार्टफोन जोडून त्यांच्या सिरीजचा विस्तार केला आहे. कंपनीने होम मार्केटमध्ये Y300 लाइनअपमधील नवीन स्मार्टफोन Vivo Y300 Pro+ लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका आहे. कारण या स्मार्टफोनची किंमत कमी आहे आणि फीचर्स व बॅटरी पावरफुल आहे.
Vivo Y300 Pro+ हा स्मार्टफोन कमी किमतीत शक्तिशाली वैशिष्ट्यांसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॅटरी पॅक. हा स्मार्टफोन त्यांच्या युजर्सना पावरफुल बॅटरी ऑफर करत आहे. ज्यामुळे स्मार्टफोनची चार्जिंग दिर्घकाळ टिकते. विवोच्या नवीनतम स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि इतर डिटेल्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Vivo Y300 Pro+ स्मार्टफोनमध्ये 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा डिस्प्ले HDR10+, FHD+ रिझोल्यूशन आणि 5000 निट्सपर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा Vivo फोन Qualcomm च्या Snapdragon 7s Gen 3 चिपसेटवर आधारित आहे, जो 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेजसह येतो.
फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनचा प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेल सोनी IMX882 सेन्सर आहे. या फोनमध्ये 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.
Vivo Y300 Pro+ स्मार्टफोनमध्ये 7300mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. व्यावसायिक फोनमध्ये पहिल्यांदाच या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
यासोबतच, फोनमध्ये ब्लूटूथ 5.2, स्टीरिओ स्पीकर्स, एनएफसी, ड्युअल सिम (नॅनो + नॅनो), वायफाय 6, ऑरा लाईट एलईडी रिंग आणि अँड्रॉइड 15 वर आधारित ओरिजिनओएस 15 कस्टम स्किन आहे.
Vivo Y300 Pro+ स्मार्टफोन स्टार सिल्व्हर, सिंपल ब्लॅक आणि मायक्रो पिंक रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा विवो फोन चार व्हेरिअंटमध्ये बाजारात लाँच करण्यात आला आहे. या फोनचा पहिला व्हेरिअंट 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 1799 युआन म्हणजेच सुमारे 21 हजार रुपये आहे.
या विवो फोनचा दुसरा व्हेरिअंट 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत 1999 युआन म्हणजेच सुमारे 23 हजार रुपये आहे. 12 GB रॅम पर्याय आणि 256GB स्टोरेज असलेला तिसरा व्हेरिअंट 2199 युआन म्हणजेच सुमारे 26 हजार रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचा चौथा व्हेरिअंट 12 GB रॅम सपोर्ट आणि 512 GB स्टोरेजसह येतो ज्याची किंमत 2499 युआन म्हणजेच सुमारे 29 हजार रुपये आहे.