Baba Vanga Prediction on Mobile Phone: बाबा वेंगा यांची भयंकर भविष्यवाणी, वाचून स्मार्टफोन युजर्सची झोपच उडेल!
बाबा वेंगा कोण आहेत आणि त्यांनी केलेल्या भविष्यवाणी याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी आतापर्यंत खऱ्या होत आलेल्या आहेत. यामुळेच बाबा वेंगा भविष्यवाण्या करण्यासाठी ओळखले जातात. बाबा वेंगा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी अनेक भाकित केली होती. कोणत्या वर्षात जगावर कोणतं संकट येणार आहे, याची भविष्यवाणी बाब वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वीच केली आहे. इतर विषयांप्रमाणेच बाब वेंगा यांनी मोबाईल बाबतीत देखील एक भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी लोकांना आश्चर्यचकित करू शकते. बाबा वेंगा यांचे 28 वर्षांपूर्वी 1997 मध्ये निधन झाले होते आणि त्यांनी भविष्याशी संबंधित घटनांबद्दल आधीच सांगितले होते.
बाबा वांगा यांनी त्यांच्या भाकितात म्हटले होते की 2022 मध्ये लोक स्क्रीनवर गरजेपेक्षा जास्त वेळ घालवू लागतील. आजच्या काळाकडे पाहिले तर मोबाईल फोनचे व्यसन वाढत आहे. हे फक्त एकाच वर्गातील लोकांमध्येच घडते असे नाही तर सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. मोबाईल फोन, टीव्ही किंवा लॅपटॉप, या सर्व गोष्टींचे व्यसन केवळ एकाच देशातील लोकांमध्ये नाही, तर असे म्हणता येईल की आज संपूर्ण जग मोबाईल फोनवर चालत आहे. मुलांनी अगदी लहान वयातच फोन वापरायला सुरुवात केली आहे. मोबाईलचा वापर केल्याशिवाय दिवसच जात नाही. कारण मोबाईल सध्याच्या काळाची गरज बनला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतातील सुमारे 24 टक्के मुले झोपण्यापूर्वी स्मार्टफोन पाहतात. सुमारे 37 टक्के मुले अशी आहेत जी जास्त स्क्रीन टाइममुळे कोणत्याही कामावर योग्यरित्या लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. हा सर्व अहवाल पाहता असं दिसत आहे की, आता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी होत आहे.
बाबा वांगाच्या अनेक भाकिते खऱ्या ठरल्या आहेत. त्याने दुसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती. याशिवाय, बाबा वांगा यांनी 2004 च्या त्सुनामी, 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेला दहशतवादी हल्ला, स्टॅलिन आणि झार बोरिस तिसरा यांच्या मृत्यूच्या तारखा याबद्दल आधीच सांगितले होते. बाबा वांगा यांनी 2025 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल अशीही भविष्यवाणी केली आहे. याशिवाय, त्यांनी 2043 पर्यंत युरोपमध्ये मुस्लिम राजवट स्थापनेबद्दलही बोलले आहे.
बाबा वांगा यांचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी बल्गेरियात झाला. बालपणीच एका वादळात त्याची दृष्टी गेली. पण बाबा वांगा अशा अनेक भाकिते करायचे ज्या नैसर्गिक आपत्ती, राजकीय जग किंवा अशा इतर घटनांशी संबंधित होत्या ज्या अनेक लोकांना प्रभावित करू शकतात.