नव्या Vivo स्मार्टफोनची भारतात तुफानी एंट्री! 7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार 'हे' पावरफुल फीचर्स
विवोने त्यांचा नवीन स्मार्टफोन 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 4GB+128GB, 6GB+128GB आणि 6GB+256GB यांचा समावेश आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची किंमत जाहीर केली नाही. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन फेस्टिव रेड, सीशोर ग्रीन आणि नोबल गोल्ड रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
Smartphone Launched:
विवोने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.75 इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. स्क्रीनची पीक ब्राइटनेस 1250 निट्सपर्यंत वाढवली जाऊ शकते आणि हे 83 टक्के एनटीएससी कलर गॅमट कवर करते. याशिवाय, डिस्प्लेला TÜV ऱ्हाइनलँड लो ब्लू लाईट सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे.
परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेला दमदार स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट मिळणार आहे. यासोबतच फोनमध्ये ऑक्टा-कोर सीपीयू मिळणार आहे, ज्याची कमाल क्लॉक स्पीड 2.2GHz आहे. या डिव्हाईसमध्ये एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे. याशिवाय, डिव्हाईसमध्ये एक्सटेंडेड रॅम फीचर देखील मिळणार आहे, ज्याच्या मदतीने 6GB पर्यंत जास्तीची रॅम देखील मिळणार आहे.
फोटोग्राफी लवर्ससाठी फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा बोकॅह सेंसर मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
फोनमध्ये 44W फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7200mAh बॅटरी दिली आहे. कंपनीच्या लॅब चाचण्यांनुसार, हा फोन 62 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक, 32 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक, 10.2 तास नेव्हिगेशन आणि 11.4 तास गेमिंगची सुविधा देऊ शकतो.
डिव्हाईसमध्ये ओरिजीनओएस 6 मिळणार आहे, जो अँड्रॉईड 16 वर आधारित आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये एआय इरेज, एआय कॅप्शन्स, एआय ट्रान्सक्रिप्ट असिस्ट आणि एआय क्रिएशन सारखे एआय फीचर्स देखील मिळणार आहेत. फोनमध्ये एआय सुपरलिंक कनेक्टिविटी फीचर देखील मिळणार आहे. याशिवाय डिव्हाईसमध्ये पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP68 आणि IP69 रेटिंग दिली आहे.






