Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telegram बॅन होताच वेगाने वाढली VPN ची डाउनलोड संख्या! कसं करत काम अ‍ॅप? जाणून घ्या सविस्तर

Telegram Ban In India: भारतामध्ये टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातल्यानंतर VPN अ‍ॅप्सच्या डाउनलोड्समध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नीट पुनर्परीक्षेपूर्वी पेपरफुटी आणि फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून, त्यानंतर अनेक युजर्स टेलिग्राम अ‍ॅक्सेस करण्यासाठी व्हिपीएनचा वापर करत असल्याचे दिसत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2026 | 10:41 AM
Telegram बॅन होताच वेगाने वाढली VPN ची डाउनलोड संख्या! कसं करत काम अ‍ॅप? जाणून घ्या सविस्तर

Telegram बॅन होताच वेगाने वाढली VPN ची डाउनलोड संख्या! कसं करत काम अ‍ॅप? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • टेलिग्रामवरील तात्पुरत्या बंदीनंतर भारतात व्हिपीएन डाउनलोड्स आणि साइन-अप्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
  • NEET 2026 पुनर्परीक्षेपूर्वी पेपरफुटी आणि फसवणूक रोखण्यासाठी सरकारने 22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी घातली आहे.
  • व्हिपीएन युजरचा खरा आयपी अ‍ॅड्रेस लपवून वेगळ्या सर्व्हरद्वारे इंटरनेट अ‍ॅक्सेस देतो, त्यामुळे ब्लॉक केलेल्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचणे शक्य होते.
भारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर आता यूजर्स इतर मार्ग आणि अ‍ॅप्स शोधत आहेत. भारतात टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्यात आल्यानंतर व्हिपीएनची डाऊनलोड संख्या वेगाने वाढली आहे. प्रोटोन व्हिपीएनचं असं म्हणणं आहे की, टेलिग्रामवर बंदी घातल्यानंतर भारतात व्हिपीएनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कंपनीने लिहीले आहे की, भारतात मंगळवारी प्रति तासाला होणारे रजिस्ट्रेशन 150 टक्के आणि बुधवारी रोजच्या रजिस्ट्रेशनमध्ये 120 टक्के वाढ पाहायला मिळाली. यामुळे आता असा अंदाज लावला जात आहे की, लोकं टेलिग्रामचा वापर करण्यासाठी व्हिपीएनची मदत घेत आहेत.

Father’s Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle

टेलिग्रामवर बंदी घालण्याचे कारण काय?

21 जून रोजी म्हणजेच आज देशात नीट पुर्नपरीक्षा होणार आहे. या परीक्षेपूर्वी पेपरफुटी सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी भारत सरकारने 22 जूनपर्यंत टेलीग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय जाहिर केला. याव्यतिरिक्त, टेलिग्रामचे मेसेज एडिटिंग फीचर देखील 30 जूनपर्यंत डिसेबल करण्यात आले आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की, मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामचा वापर पेपरफुटीसारख्या प्रकरणांमध्ये करण्यात आला आहे. पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने टेलिग्रामवर गंभीर आरोप करत हा प्लॅटफॉर्म डार्क वेब बनत असल्याचा आरोप केला आहे आणि याचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी करत असल्याचा दावा देखील केला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

व्हिपीएन डाऊनलोड करणाऱ्या यूजर्सची संख्या वाढली

सरकारने टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता भारतीय यूजर्स 22ज जूनपर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम अ‍ॅक्सेस करू शकत नाही. अशा परिस्थितीत अनेकांनी व्हिपीनचा वापर करत एक नवीन पद्धत शोधली आहे. व्हिपीएन यूजरचा आयपी अ‍ॅड्रेस लपवतो, यामुळे बॅन झालेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा अ‍ॅप्स अगदी सहज अ‍ॅक्सेस केले जाऊ शकतात.

प्रोटोन व्हिपीएनटे जनरल मॅनेजर डेविड पीटरसन यांनी एक्स पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, टेलिग्रामवर बंदी घातल्यानंतर व्हिपीएनची डाऊनलोड संख्या वेगाने वाढली आहे. तथापी, आता पीटरसनचे एक्स अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आले असल्याचे माहिती समोर आली आहे. व्हिपीएन साइन-अपशिवाय गूगल ट्रेंडमध्ये देखील पाहायला मिळत आहे. लोकं गेल्या दोन दिवसांपासून टेलिग्राम व्हिपीन आणि व्हिपीन फॉर टेलिग्राम सारख्या टर्म्स मोठ्या प्रमाणात शोधत आहेत. यावरून असे दिसून येते की, लोक आता या बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्याचे मार्ग शोधत आहेत.

International Yoga Day 2026: आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी काही मिनिटांत तयार करा प्रोफेशनल फोटो! वापरा हे Gemini Prompts

कसे काम करते व्हिपीएन?

व्हिपीएन म्हणजेच वर्चुअल प्राइवेट नेटवर्क इंटरनेट कनेक्शन सुरक्षित ठेवते. हे यूजरचा खरा आयपी अ‍ॅड्रेस लपवतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, इंटरनेटच्या वापरासाठी भौगोलिक स्थान (जियोलोकेशन) बदलते आणि यूजरच्या स्थानाऐवजी व्हिपीएन सर्व्हरचा आयपी अ‍ॅड्रेस दिसतो. व्हिपीएन तुमची ऑनलाइन माहिती ‘एनक्रिप्टेड’ स्वरूपात रूपांतरित करते, ज्यामुळे ती हॅक करणे कठीण होते.

Web Title: Vpn download number increase after government banned telegram in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • Telegram

संबंधित बातम्या

आयटेलचा Ace 3 Heera भारतात लॉन्च; आता फीचर फोनलाही मिळणार Type-C चार्जिंगची सुविधा
1

आयटेलचा Ace 3 Heera भारतात लॉन्च; आता फीचर फोनलाही मिळणार Type-C चार्जिंगची सुविधा

Delhi Mobile Cover Market: 50 पासून मिळतात ट्रेंडी मोबाईल कव्हर्स! दिल्लीतील ‘हे’ मार्केट आहे ग्राहकांचे फेव्हरेट
2

Delhi Mobile Cover Market: 50 पासून मिळतात ट्रेंडी मोबाईल कव्हर्स! दिल्लीतील ‘हे’ मार्केट आहे ग्राहकांचे फेव्हरेट

Tech Tips: कारच्या USB पोर्टने लॅपटॉप चार्ज करता? आधी ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या…
3

Tech Tips: कारच्या USB पोर्टने लॅपटॉप चार्ज करता? आधी ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या…

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर
4

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.