Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर

Amazon LEO: ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन आता सॅटेलाइट-आधारित डायरेक्ट-टू-डिव्हाइस (D2D) कनेक्टिव्हिटी सर्विस आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे मोबाईल टॉवरशिवाय थेट सॅटेलाइटद्वारे फोनला नेटवर्क मिळणार असून, दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2026 | 10:48 AM
सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर

सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • ॲमेझॉन लवकरच LEO सॅटेलाइटवर आधारित D2D (डायरेक्ट-टू-डिवाइस) सर्विस लाँच करण्याच्या तयारीत आहे.
  • या तंत्रज्ञानामुळे मोबाईल टॉवरशिवाय थेट सॅटेलाइटद्वारे फोनला नेटवर्क मिळणार आहे.
  • दुर्गम, डोंगराळ आणि नेटवर्क नसलेल्या भागातही आपत्कालीन संपर्क आणि कनेक्टिव्हिटी शक्य होणार आहे.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन लवकरच त्यांची एक नवीन D2D सर्विस लाँच करण्याची तयारी करत आहे. ॲमेझॉनची ही सॅटेलाईट बेस्ड सर्विस स्टारलिंकच्या डायरेक्ट-टू-डिवाइस सर्विसप्रमाणेच असणार आहे. या सर्विसमध्ये इंटरनेट सर्विस डायरेक्ट फोनमध्ये ॲक्सेस केली जाऊ शकते. स्टारलिंकने यापूर्वी अमेरिकन टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर T-Mobile च्या सहकार्याने डायरेक्ट-टू-डिवाइस (D2D) सर्विसची चाचणी केली होती. त्यानंतर ॲमेझॉन देखील त्यांच्या या सर्विसची चाचणी करत आहे.

नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच स्वस्त झाला Pixel 10! ऑफर्स आणि डिस्काऊंटसहस खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ही डील चुकवू नका

समोर आलेल्या काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, ॲमेझॉनने यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांची सॅटेलाइट बेस्ड डायरेक्ट-टू-डिवाइस सर्विस लाँच करण्याबाबत काही संकेत दिले होते. या उद्देशासाठी कंपनी प्रमुख उपग्रह ऑपरेटर ‘ग्लोबलस्टार’ (Globalstar) चे अधिग्रहण करण्यास सज्ज आहे. पण कंपनीची ही सर्विस नक्की काय आहे आणि याचा कशा पद्धतीने वापर केला जाऊ शकतो, याबद्दल आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Amazon) 

काय आहे D2D टेक्नोलॉजी?

नावावरून समजते की, D2D म्हणजेच डायरेक्ट-टू-डिवाइस टेक्नोलॉजी. यामध्ये कोणत्याही मोबाईल टॉवरचा वापर केला जात नाही. हे तंत्रज्ञान एखाद्या मोबाईल फोन किंवा डिव्हाईसला दुसऱ्या डिव्हाईससोबत डायरेक्ट सॅटेलाइटच्या माध्यमातून कनेक्टिविटी प्रदान करते. या सर्विसमध्ये मोबाईल फोनला थेट अंतराळात फिरत असणाऱ्या LEO म्हणजेच लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइटकडून सिग्नल मिळतो.

या तंत्रज्ञानाचा फायदा असा आहे की, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कनेक्टिविटी मिळणार आहे. तुम्ही जंगलात असाल किंवा समुद्राच्या किनारी किंवा वाळवंटात, तुमच्या मोबाईलवर प्रत्येक ठिकाणी सिग्नल असणार आहे. तुम्ही तुमच्या फोनने कोणासोबतही संपर्क करू शकतात. स्टारलिंकने D2D सर्विससाठी अमेरिकन मोबाइल ऑपरेटर T-Mobile आणि Verizon सोबत भागिदारी केली आहे.

ॲमेझॉन D2D टेक्नोलॉजीचा असा होणार फायदा

ॲमेझॉन त्यांच्या LEO सॅटेलाइट्सना Globalstar च्या इंफ्रास्ट्रक्चरसोबत जोडणार आहे, ज्याद्वारे यूजर्सना थेट सॅटेलाईटमधून सिग्नल मिळणार आहे. या सर्विसचा फायदा डोंगराळ भागात आणि खेडेगावात राहणाऱ्या लोकांना होणार आहे. विशेषत: अशा ठिकाणी जिथे नेटवर्क खूप कमकुवत आहे किंवा उपलब्धच नाही, अशा ठिकाणी राहणारे नागरिक या सर्विसचा फायदा घेऊ शकणार आहेत.

Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत… ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

सॅटेलाइट बेस्ड कनेक्टिविटीचा सर्वात मोठी फायदा आपत्कालीन परिस्थितीत होणार आहे. जेव्हा लोकांना वाचवण्यासाठी संपर्क करण्याची गरज भासणार असेल. D2D सर्विस सॅटेलाइट इंटरनेटपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. सॅटेलाइटवरून सिग्नल मिळवण्यासाठी राउटर किंवा डिशची गरज भासणार नाही; त्याऐवजी, मोबाइल डिव्हाइस थेट सॅटेलाइट सिग्नल प्राप्त करेल.

Web Title: What is amazon d2d satellite service service how it will work know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • amazon
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.