Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या

Messaging App Bitchat: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनादरम्यान इंटरनेट सेवा बंद असल्याची चर्चा आहे. असे असताना देखील आंदोलकांमध्ये मेसेजिंग सुरू असल्याचे दावे केले जात आहेत. इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद असताना मेसेज कसे काय केले जाऊ शकतात, याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 24, 2026 | 12:15 PM
Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या

Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • इंटरनेटशिवाय मेसेजिंगसाठी आंदोलकांनी बिटचॅटसारख्या ऑफलाइन ॲपचा वापर केला असावा, अशी चर्चा आहे.
  • हे ॲप ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) द्वारे मेश नेटवर्क तयार करून संदेश पुढे पोहोचवते.
  • आंदोलकांनी Bitchat वापरल्याची कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
दिल्लीमधील जंतर-मंतर येथे गेल्या अनेक दिवसांपासून नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत, आंदोलन सुरुच राहील असे संघटनेने स्पष्टपणे सांगितलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं जंतर-मंतर येथे एकत्र येत आहेत. या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर येथे सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. तसेच अलीकडेच जंतर-मंतर येथे इंटरनेट देखील बंद करण्यात आल्याचे सांगितलं जात होतं.

WhatsApp Update: टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये होऊ शकतो मोठा बदल! PIN ऐवजी मिळू शकतो ‘हा’ पर्याय, यूजर्सवर होणार परिणाम?

आंदोलक इंटरनेटशिवाय कसे करतात मेसेज?

इंटरनेट बंद केल्यानंतर आंदोलक एक-दुसऱ्यांना मेसेज कसे करत होते? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यासाठी एका विशेष ॲपचा वापर केला असण्याची शक्यता आहे. हे ॲप म्हणजेच बिटचॅट. बिटचॅट हे एक ऑफलाइन मेसेजिंग ॲप आहे. जंतर-मंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आंदोलक बिटचॅट या मेसेजिंग ॲपचा वापर करत असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्याप जारी करण्यात आले नाही. मात्र बिटचॅटचा वापर करण्यासाठी मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेटवर अवलंबून राहावे लागत नाही, यामुळेच आंदोलनकर्ते हे ॲप वापरत असावेत, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

कसा काम करतो ऑफलाईन मेसेजिंग ॲप?

खरं तर, बिटचॅट हे एक असं मेसेजिंग ॲप आहे, जे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कवर अवलंबून नसते. हे ब्लूटूथ लो एनर्जी म्हणजेच BLE च्या मदतीने आजूबाजूला उपलब्ध असलेल्या दुसऱ्या फोनसोबत कनेक्ट होते. अशावेळी जेव्हा अनेक फोन एकमेकांसोबत जोडले जातात, त्यावेळी एक मेश नेटवर्क तयार केले जाते.

अशा परिस्थितीत एखादा यूजर कोणत्याही दुसऱ्या यूजरला कोणता मेसेज पाठवतो, तेव्हा तो मेसेज उपलब्ध असलेल्या दुसऱ्या डिव्हाईसद्वारे पुढे पाठवला जातो आणि अखेर तो त्याच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचतो. याचा अर्थ असा आहे की, प्रत्येक फोन एका लहान रिले पॉइंट्सप्रमाणे काम करतो. या मेश नेटवर्कचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, जितके जास्त लोक जोडले जातात, तितका जास्त अंतरापर्यंत मेसेज पोहोचवला जाऊ शकतो. यामुळेच इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क बंद असतानाही हे ॲप मर्यादित अंतरापर्यंत संदेश पाठवण्याची सुविधा देते.

धक्कादायक! मानवाशिवाय AI ने अब्ज डॉलरच्या कंपनी सिस्टीमवर केला सायबर हल्ला; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

अनेक ऑफलाईन मेसेजिंग ॲप्स उपलब्ध

असं सांगितलं जात आहे की, बिटचॅटव्यतिरिक्त अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी अनेक ऑफलाईन मेसेजिंग ॲप्स उपलब्ध आहेत, जे ब्लूटूथ किंवा वायफाय डायरेक्टद्वारे इंटरनेटशिवाय कम्युनिकेशनची सुविधा ऑफर करतात. अशा ॲप्सचा वापर आपत्कालीन परिस्थितीत, नेटवर्क बिघाड झाल्यास किंवा दुर्गम भागांमध्ये केला जाऊ शकतो. तथापी, जंतर-मंतर येथील आंदोलनकर्ते खरंच बिटचॅटचा वापर करत आहे का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र केवळ असे दावे केले जात आहेत.

Web Title: What is bitchat which can be use without mobile network and internet read in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • CJP
  • internet
  • Tech News

संबंधित बातम्या

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
1

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
2

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
3

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…
4

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.