WhatsApp Update: टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये होऊ शकतो मोठा बदल! PIN ऐवजी मिळू शकतो 'हा' पर्याय, यूजर्सवर होणार परिणाम?
WABetaInfo ने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप एका नवीन सुरक्षा फीचरवर काम करत आहे, जे यूजर्सना सध्याच्या टू-स्टेप वेरिफिकेशन पिनच्या पासवर्डला रिप्लेस करण्याची सुविधा देणार आहे. सध्या व्हॉट्सॲपच्या टू-स्टेप वेरिफिकेशनसाठी 6 अंकी न्यूमेरिक पिन सेट करावा लागतो. असं सांगितलं जात आहे की, जर हे फीचर अपग्रेड झाले तर यूजर्सना असा पासवर्ड सेट करावा लागणार आहे, ज्यामध्ये अक्षरं आणि अंक समाविष्ट असणार आहेत. यामुळे सुरक्षा आणखी मजबूत होऊ शकते. जे यूजर्स व्हॉट्सॲपवर व्यवहार करतात किंवा संवेदनशील माहिती शेअर करतात, अशा यूजर्ससाठी हे फीचर फायद्याचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
खरं तर, व्हॉट्सॲप यूजर्ससाठी टू-स्टेप वेरिफिकेशन एक ऑप्शनल फीचर आहे. यामुळे जे यूजर्स व्हॉट्सॲपच्या टू-स्टेप वेरिफिकेशन फीचरचा वापर करत नाहीत, त्यांच्यावर या बदलाचा काहीही परिणाम होणार नाही. असं सांगितलं जात आहे की, हे आगामी फीचर सध्या चाचणी टप्प्यात आहे आणि अद्याप बीटा यूजर्ससाठी देखील उपलब्ध केले नाही. लाँचिंगपूर्वी कंपनी या फीचरबाबत मोठा निर्णय घेत यामध्ये काही बदल देखील करू शकते.
यूजर्स त्यांच्या व्हॉट्सॲप अकाऊंटमध्ये टू-स्टेप वेरिफिकेशन सेटिंग्स मॅनेज करू शकतात. ॲपमध्ये तुम्हाला हे फीचर चालू करण्याचा, बंद करण्याचा आणि पिन बदलण्याचा पर्याय देखील मिळतो.






