Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्रामचे नवीन अपडेट म्हणजेच ग्रे टिक चर्चेत आहे. इंस्टाग्राम वापरणाऱ्या अनेक यूजर्सना त्यांच्या प्रोफाईलवर ग्रे टिक दिसत आहे. या ग्रे टिकचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2026 | 01:16 PM
Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्राम ग्रे टिक हा मेटा व्हेरिफाईड सब्सक्रिप्शनसाठी पात्रता दर्शवणारा प्रॉम्प्ट असल्याचे मानले जात आहे.
  • काही यूजर्सनी दावा केला आहे की ग्रे टिक दिसल्यानंतर त्यांच्या रील्स आणि पोस्ट्सची रिच व व्ह्यूज कमी झाले आहेत.
  • इंस्टाग्रामने ग्रे टिक आणि रिच कमी होण्याचा संबंध अधिकृतपणे स्पष्ट केलेला नाही, त्यामुळे इनसाइट्स तपासूनच निष्कर्ष काढणे योग्य ठरेल.
इंस्टाग्राम हे सर्वाधित चर्चेत असणारे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण इंस्टाग्रामचा वापर करतात. इंस्टाग्रामवरील छोटे अपडेट किंवा एक छोटा बदल देखील लोकांचे लक्ष वेधून घेतो. आता आम्ही तुम्हाला अशाच एका अपडेटबद्दल सांगणार आहोत, ज्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

इंस्टाग्रामवर अनेक यूजर्सना त्यांच्या अकाऊंटवर एक ग्रे टिक दिसत आहे. या ग्रे टिकबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक यूजर्सनी असा दावा देखील केला आहे की, ग्रे टिकमुळे त्यांच्या अकाऊंटला पूर्वीसारखी रीच मिळत नाही आणि त्यांनी शेअर केलेल्या रिल्सला पूर्वीच्या तुलनेत खूप कमी व्ह्युज मिळत आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – AI Created) 

नेमकं काय आहे प्रकरण?

अनेक इंस्टाग्राम यूजर्सना त्यांच्या प्रोफाईलवर यूजरनेमच्या बाजूला हलक्या राखाडी रंगाचा चेकमार्क म्हणजेच ग्रे टिक दिसत आहे. हा एक प्रकारचा इंस्टाग्राम प्रॉम्प्ट आहे. याचा अर्थ असा मानला जात आहे की, तुमचे अकाऊंट मेटा व्हेरिफाईड सब्सक्रिप्शनसाठी पात्र आहे.

यूजरनेमच्या बाजूला दिसणाऱ्या या ग्रे टिकवर टॅप करता, तुमच्या समोर मेटा व्हेरिफाईड पर्याय दिसू लागेल. इथून तुम्ही पेड सब्सक्रिप्शन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु करू शकता. सब्सक्रिप्शन खरेदी केल्यानंतर तुम्हाला सामान्य ब्लू व्हेरिफाईड बॅज मिळणार आहे. विशेष म्हणजेच तुमच्या फॉलोवर्सना तुमच्या अकाऊंटवरील ही ग्रे टिक दिसणार नाही. अकाऊंटवरील ग्रे टिक केवळ असेच यूजर्स पाहू शकतात, ज्यांच्याकडे हे अकाऊंट लॉगिन आहे.

यूजर्सनी केला ‘हा’ दावा

अनेक यूजर्सनी दावा केला आहे की, ग्रे टिकमुळे त्यांच्या अकाऊंटची रीच पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. तसेच ग्रे टिक मिळालेल्या यूजर्सच्या रिल्स आणि पोस्टवर पूर्वीपेक्षा कमी व्ह्युज मिळत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे या ग्रे टिकमुळे यूजर्स प्रचंड हैराण झाले आहेत. मात्र ग्रे टिक आणि अकाऊंटची रीच व रिल्सचे व्ह्यु यांचा काही संबंध आहे का, याबाबत अद्याप इंस्टाग्रामने कोणतीही माहिती शेअर केली नाही.

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

तुमच्या अकाऊंटवर देखील ग्रे टिक दिसत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या अकाऊंटची रिच कमी झाली आहे किंवा तुमच्या रिल्स आणि व्हिडीओला पूर्वीसारखे व्ह्यु मिळत नाहीत. अशावेळी मागील 10 ते 15 पोस्ट्सच्या रिल्सची तुम्ही शेअर केलेल्या लेटेस्ट रिल्ससोबत तुलना करा. इंस्टाग्राम इनसाइट्समध्ये पाहा की, लोकं तुमची संपूर्ण रिल पाहत आहेत की, सुरुवातीच्या काही सेकंदातच व्हिडीओ स्किप करत आहेत. यामुळे तुम्हाला समजू शकेल की, खरंच रिच कमी झाली आहे की नाही.

Web Title: What is the meaning of instagram grey tick is it really affect on views and reach know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
1

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर
2

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
3

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
4

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.