OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर
स्मार्टफोन यूजर्समध्ये OnePlus ची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. दमदार कॅमेरा, कूल डिझाईन आणि पावरफुल फीचर्स पाहिजे असतील तर OnePlus ची निवड केली जाते. OnePlus नेहमीच इतर स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी प्रिमियम रेंजमधील डिव्हाईस लाँच करत असते. मात्र आता सांगितलं जात आहे की, OnePlus बंद होणार आहे आणि कंपनी स्मार्टफोन बनवणं देखील बंद करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
2026 मध्ये स्मार्टफोन मार्केटमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत, याबात गेल्या अनेक महिन्यांपासून सांगितलं जात आहे. याची सुरुवात नवीन वर्ष सुरु होताच झाली होती. काही दिवसांपूर्वीच एक बातमी समोर आली होती की, स्मार्टफोन क्षेत्रातील Realme आणि OnePlus या दोन्ही दिग्गज कंपन्या Oppo च्या सब-ब्रँड म्हणून काम करणार आहेत. या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. तसेच काही यूजर्सना धक्का देखील बसला होता. यानंतर धक्क्यानंतर आता स्मार्टफोन यूजर्सना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. कारण आता असं सांगितलं जात आहे की, OnePlus कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. कंपनी आता स्मार्टफोन बनवणं देखील थांबवणार आहे. या बातमीमुळे सर्व स्मार्टफोन यूजर्सना धक्का बसला आहे.
एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, OnePlus ब्रँड आता बंद होणार आहे. HTC, LG सारख्या कंपन्यांमध्ये आता OnePlus चा देखील समावेश केला जाऊ शकतो. HTC, LG सारख्या कंपन्यांनी स्मार्टफोन बनवणं बंद केलं आहे. आता OnePlus देखील असाच निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधितकृत माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र सोशल मीडियावर बऱ्याच अफवा व्हायरल होत आहेत. याशिवाय कंपनीने त्यांच्या स्मार्टफोनचे अपकमिंग लाँच देखील रद्द केले असल्याचं सांगितलं जात आहे. Oneplus 15s आणि OnePlus Open 2 यावर्षी लाँच केले जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आता कंपनी याबाबत कोणती आणि कधी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






