Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

USB Killer : ५०० रुपयांची एक चूक अन् लाखोंचे क्षणात नुकसान; अनोळखी पेन ड्राईव्ह ठरतोय घातक

जर तुम्हाला कुठे एखादा अनोळखी पेन ड्राइव्ह सापडला, तर तो वापरण्यापूर्वी दोनदा विचार करा. तो एक साधा यूएसबी ड्राइव्ह नसून, तुमच्या डिव्हाइससाठी धोकादायक ठरू शकणारा 'यूएसबी किलर' असू शकतो.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 21, 2026 | 06:01 PM
What is USB Killer Device damaged due to connecting an unknown USB to the laptop tech news

What is USB Killer Device damaged due to connecting an unknown USB to the laptop tech news

Follow Us
Follow Us:

What is USB Killer : आजच्या डिजिटल युगात, छोटी गॅजेट्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. पण जर तुम्हाला एखादी अनोळखी पेन ड्राईव्ह दिसला, तर तो वापरण्यापूर्वी दहावेळा विचार करा. कारण ती एक चूक कदाचित तुमचे लाखोंचे नुकसान करु शकते. अनोळखी एक साधा यूएसबी पेन ड्राईव्ह नसून, तो एक ‘यूएसबी किलर’ असू शकतो, जो तुमचा महागडा फोन किंवा लॅपटॉप काही सेकंदात कायमचा खराब करू शकतो.

‘यूएसबी किलर’ म्हणजे काय?
‘यूएसबी किलर’ हे नावच स्पष्ट करते की हे उपकरण कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नष्ट करण्यासाठी बनवलेले आहे. ते दिसायला अगदी सामान्य पेन ड्राईव्हसारखेच असते, ज्यामुळे लोकांची सहज फसवणूक होऊ शकते. पेन ड्राईव्ह चे काम डाटा स्टोर करणे असले तरी यूएसबी किलर पेन ड्राईव्ह डाटा साठवत नाही तर तो डिव्हाइसला निकामी करतो. एकदा ते फोन, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरला जोडले की, ते लगेच नुकसान पोहोचवू लागते.

हे देखील वाचा : 6300mAh बॅटरी आणि मोठी स्क्रीन; कमी बजेटवाल्यांसाठी Redmi A7 4G स्मार्टफोन लॉन्च

हे इतके धोकादायक का आहे?

यूएसबी किलरबद्दल सर्वात धोकादायक गोष्ट ही आहे की ते शोधणे जवळजवळ अशक्य आहे. ते दिसायला सामान्य यूएसबी ड्राइव्हसारखे दिसते, परंतु त्याची शक्ती अत्यंत धोकादायक असते. एखाद्या डिव्हाइसला जोडल्याबरोबर, ते उच्च-व्होल्टेजचा प्रवाह पाठवते. काही सेकंदातच, डिव्हाइस पूर्णपणे बंद होऊ शकते आणि पुन्हा कधीही सुरू होत नाही. याचा सर्वात मोठा तोटा हा आहे की ते थेट मदरबोर्डच्या मुख्य आयसीला (IC) लक्ष्य करते, ज्यामुळे त्याची दुरुस्ती करणे जवळजवळ अशक्य होते.

यूएसबी किलर कसे काम करते?

यूएसबी किलर खूप हुशारीने काम करते. जेव्हा ते यूएसबी पोर्टमध्ये लावले जाते, तेव्हा ते डिव्हाइसच्या ५-व्होल्टच्या पुरवठ्यातून वीज खेचायला सुरुवात करते. त्यातील कपॅसिटर ही वीज साठवतात. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर, डिव्हाइसचे सर्किट्स या कमी व्होल्टेजला वेगाने काहीशे व्होल्टमध्ये रूपांतरित करतात. हे उच्च व्होल्टेज नंतर यूएसबी पोर्टद्वारे एकाच झटक्यात डिव्हाइसमध्ये परत सोडले जाते, ज्यामुळे अंतर्गत सर्किट्स जळून जातात आणि डिव्हाइस कायमचे खराब होते.

हे देखील वाचा : आता व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार! प्रीमियम फीचर्ससाठी मोजावे लागणार पैसे; पाहा काय आहे मेटाचा नवा प्लॅन

हा धोका कसा टाळावा?

  • तुमच्या डिव्हाइसमध्ये कोणतीही अनोळखी USB ड्राइव्ह लावू नका.
  • सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या गॅजेट्सपासून दूर राहा.
  • अॅक्सेसरीज नेहमी विश्वसनीय स्रोताकडूनच खरेदी करा.
  • कामाच्या ठिकाणी किंवा घरी सुरक्षेबाबत जागरूक राहा.
  • एक चूक, मोठे नुकसान.
एका लहानशा निष्काळजीपणामुळे तुमचे हजारो रुपयांचे डिव्हाइस निरुपयोगी होऊ शकते. म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादी अनोळखी पेन ड्राइव्ह दिसेल, तेव्हा ती वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

 

Web Title: What is usb killer device damaged due to connecting an unknown usb to the laptop tech news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
1

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
2

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
3

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
4

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.