
वॉर्निंगशिवाय रिव्यू केले जात आहेत WhatsApp अकाऊंट! नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने 24 तासांपर्यंत हे अकाऊंट्स ‘अंडर रिव्यू’ केले आहेत आणि या दरम्यान यूजर्स व्हॉट्सॲपच्या कोणत्याही फीचरचा वापर करू शकत नाहीत. सोमवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हे संपूर्ण प्रकरण समोर आले. यावेळी यूजर्सना इन-ॲप नोटिफिकेशनद्वारे सांगितलं गेलं की, त्यांचे अकाऊंट रिव्यू केले जात आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि व्हॉट्सॲपने याबाबत काय सांगितलं आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
गेमिंगचा खर्च वाढला! Sony ने अचानक वाढवली PS5 ची किंमत, आता मोजावे लागणार अधिक पैसे
व्हॉट्सॲपने यूजर्सना नोटिफिकेशन पाठवून या प्रोसेसबद्दल माहिती दिली होती. या मेसेजमध्ये असं लिहीलं होतं की, अकाउंट इन रिव्यू. डेट रिक्वेस्टेड 3 ऑगस्ट, 2026. तुमचे अकाऊंट ॲक्टिव्हिटी आणि डिव्हाईसची माहिती तपासली जात आहे. यामुळे माहिती मिळणार आहे की, तुमचे अकाऊंट नियम आणि अटींचे पालन करत आहे की नाही. 24 तासांत तुम्हाला निकालाची माहिती दिली जाणार आहे. या मेसेजच्या खालच्या बाजूला यूजर्सना अकाऊंटशी संबंधित समस्येबद्दल अधिक जाणून घेण्याच्या पर्यायासह इतर पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले होते. (फोटो सौजन्य: Pinterest)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की, आम्ही आमच्या यूजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या सेवांचा गैरवापर करणाऱ्यांपासून पुढे राहतो आणि असे अकाऊंट बॅन करतो. अनेकदा आमच्याकडून चुकी होते, मात्र आम्ही लवकरात लवकर आमची चूक दुरुस्त करतो.
अद्याप कंपनीने माहिती दिली नाही की, प्रभावित अकाऊंट्सचे रिव्यू कोणती टेक्नीकल समस्या किंवा ऑटोमेटिड एन्फोर्समेंट सिस्टिमशी संबंधित आहे किंवा हे कोणते अँटी-स्पॅम इनिशिएटिव आहे, ज्याअंतर्गत यूजर्सचे अकाऊंटच्या ॲक्टव्हिटी रिव्ह्यू केल्या जात आहेत. काही यूजर्सनी असा देखील दावा केला आहे की, ही संपूर्ण प्रोसेस कोणत्याही वॉर्निंगशिवाय सुरु करण्यात आली आहे. याबाबत लोकं सोशल मीडिया स्क्रीनशॉट देखील शेअर करत आहेत.
व्हॉट्सॲपने त्यांच्या हेल्प पेजवर या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. इथे सांगण्यात आले आहे की, ज्या संपर्कांना तुम्ही ओळखता केवळ अशाच लोकांसोबत संभाषण करा. तुम्ही तुमच्या संपर्कांना आधीच तुमचा फोन नंबर द्या, त्यामुळे ते तुम्हाला मेसेज करू शकतील. याशिवाय, संपर्कांकडून परवानगी घ्या आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करा. ग्रुप तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवणाऱ्या फीचरचा वापर करा आणि फॉरवर्ड मेसेजपासून सावध राहा.