Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

WhatsApp Bill Payments Feature: आता बिल पेमेंट करण्यासाठी नवीन ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही. कारण तुम्ही व्हॉट्सॲपवरूनच थेट पेमेंट करू शकणार आहात. यासाठी एक नवीन फीचर देखील रोल आऊट करण्यात आले आहे. हे फीचर कसे काम करते, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2026 | 10:11 AM
WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल... भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल... भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सॲपवर आता वीज, पाणी, गॅस आणि क्रेडिट कार्डची बिले भरता येणार.
  • 30+ कॅटेगरीतील 22,722 बिलर्सचा सपोर्ट मिळणार आहे.
  • यूपीआय, डेबिट आणि क्रेडिट कार्डने थेट बिल पेमेंट करता येणार.
WhatsApp New Feature: मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप वापरणाऱ्या यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता कंपनीने भारतीय यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरअंतर्गत आता यूजर्स व्हॉट्सॲपवरूनच वीज, पाणी आणि क्रेडिट कार्डचे बिल भरू शकणार आहात. यासाठी यूजर्स बिल पेमेंट्स फीचरचा वापर करू शकतात. हे फीचर रोलआऊट करण्यात आल्यानंतर यूजर्स ॲपमधून बाहेर न पडता थेट व्हॉट्सॲपवरून पाणी, विज आणि क्रेडिट कार्ड बिल शोधू शकतात, मॅनेज करू शकतात आणि त्यांचे पेमेंट देखील करू शकतात. हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी मेटाच्या मालकीचे हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म भारत कनेक्ट (BBPS) नेटवर्कचा वापर करणार आहे.

अरे देवा!! ग्राहकांच्या बजेटवर पुन्हा ताण; Oppo आणि Xiaomi ने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती, नवीन दर पाहून बसेल धक्का

30 हून अधिक कॅटेगरीमध्ये 22,722 बिलर्सचा सपोर्ट

यूजर्सना 30 हून अधिक कॅटेगरीमध्ये 22,722 बिलर्सचा सपोर्ट मिळणार आहे, ज्यामध्ये वीज, गॅस, पाणी, फास्टॅग, विमा, क्रेडिट कार्ड्स आणि कर्जाचे हफ्ते देखील समाविष्ट असणार आहेत. हे फीचर टप्प्याटप्प्याने रोलआऊट केले जात आहेत. येत्या काही आठवड्यांत हे फीचर संपूर्ण भारतात अँड्रॉईड आणि आयओएस यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

बिल पेमेंट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

व्हॉट्सॲपने दिलेल्या माहितीनुसार, बिल पेमेंट्स सर्विस रोलआऊट केल्यानंतर ॲपमधील पेमेंटची व्याप्ती मोबाईल रिचार्ज आणि इतर व्यवहारांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही तर त्यापलीकडे जाऊन लक्षणीयरीत्या विस्तारली आहे. यूजर्स व्हॉट्सॲप ओपन करून होम स्क्रीनवर वरच्या बाजूला दिसणाऱ्या ₹ (रुपये) आयकॉनवर टॅप करून बिल पेमेंट्स सेवा सुरु करू शकतात. यानंतर यूजर्सना बिल कॅटेगरी आणि बिलरची निवड करावी लागणार आहे. आता अकाऊंट डिटेल्स भरा आणि कंफर्म करा. आता पेमेंट करू शकतात. पण पेमेंट करण्यापूर्वी बिलाची रक्कम पुन्हा एकदा तपासून पाहा. व्हॉट्सॲपवर बिलाचे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला यूपीआय, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड असे तीन पेमेंट ऑप्शन्स मिळणार आहेत.

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

वन-टॅप ॲक्सेस आणि एकाच बिलरअंतर्गत विविध अकाऊंट्स

व्हॉट्सॲपवर रोलआऊट करण्यात आलेल्या या फीचरची आणखी एक विशेषत: म्हणजेच हाउसहोल्ड बिल्स समरी. यामध्ये जुनी बिले आपोआप दर्शविली जातील, तसेच ज्या बिलर्सना तुम्ही यापूर्वी व्हॉट्सॲपद्वारे पैसे दिले आहेत, ते होम स्क्रीनवर ‘वन-टॅप ॲक्सेस’सह पाहू शकता. कंपनीचं असं म्हणणं आहे की, यूजर्स एकाच बिलरअंतर्गत विविध अकाऊंट्स देखील मॅनेज करू शकणार आहेत. ज्यामुळे घर, ऑफीस किंवा कुटूंबातील सदस्यांची बिले एकाच ठिकाणाहून भरणे सोपे होते. या फीचरअंतर्गत यूजर्सना प्रसिद्ध बिल कॅटेगरीज आपोआप वरच्या बाजूला दिसणार आहेत. तसेच संपूर्ण यादी पाहण्यासाठी यूजर्सना सी ऑल पर्यायाची निवड करावी लागणार आहे. यामध्ये 20 हून अधिक कॅटेगरी असणार आहेत.

Web Title: Whatsapp bill payments feature rolled out in india now pay electricity water and credit card bills directly on whatsapp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
1

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री
2

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री

Dell Launches New Al PCs: Dellचा AI धमाका! भारतीय कंपन्यांसाठी नवे AI PCs, वर्कस्टेशन्स आणि मॉनिटर्स लॉन्च
3

Dell Launches New Al PCs: Dellचा AI धमाका! भारतीय कंपन्यांसाठी नवे AI PCs, वर्कस्टेशन्स आणि मॉनिटर्स लॉन्च

VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! ‘हा’ अभिनेता नवा ब्रँड अॅम्बेसेडर, नव्या लोगोचीही दमदार एन्ट्री
4

VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! ‘हा’ अभिनेता नवा ब्रँड अॅम्बेसेडर, नव्या लोगोचीही दमदार एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.