Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: स्कॅमर्सची खैर नाही! अनोळखी नंबरवरून मेसेज येताच यूजर्सना मिळणार इशारा; कसं काम करणार नवं फीचर?

WhatsApp Warning Feature: लवकरच व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक नवीन फीचर रोलआऊट केलं जाणार आहे. यामध्ये यूजर्सना अनोळखी नंबरवरून आलेले मेसेज ओपन करण्यापूर्वी एक वॉर्निंग मेसेज मिळणार आहे. या मेसेजनंतर अनोळखी नंबरसोबत संभाषण करायचे की नाही, याचा निर्णय यूजर्स घेणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 26, 2026 | 10:56 AM
WhatsApp Update: स्कॅमर्सची खैर नाही! अनोळखी नंबरवरून मेसेज येताच यूजर्सना मिळणार इशारा; कसं काम करणार नवं फीचर?

WhatsApp Update: स्कॅमर्सची खैर नाही! अनोळखी नंबरवरून मेसेज येताच यूजर्सना मिळणार इशारा; कसं काम करणार नवं फीचर?

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅप लवकरच अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजसाठी नवीन वॉर्निंग फीचर आणणार आहे.
  • चॅट उघडण्यापूर्वी यूजर्सना स्कॅम आणि फसवणुकीबाबत इशारा देणारा अलर्ट दिसणार आहे.
  • नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
WhatsApp New Feature: मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना स्कॅम आणि सायबर फ्रॉडपासून सुरक्षा मिळावी यासाठी कंपनी सतत नवीन फीचर्स घेऊन येत आहे. आता कंपनी असेच आणखी एक फीचर लवकरच सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मेटा यूजर्सना धोकादायक संभाषणं ओळखण्यासाठी मदत करणार आहे. यासाठीच एका नवीन फीचरवर काम सुरु असून लवकरच हे फीचर यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे.

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज… ‘या’ दिवशी सुरू होणार विक्री

नवीन वॉर्निंग मेसेज

एका फीचर ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एक नवीन वॉर्निंग मेसेज स्पॉट केला आहे. जेव्हा यूजर्स एखाद्या अनोळखी नंबरवरून आलेले चॅट्स ओपन करतात, तेव्हा हा वॉर्निंग मेसेज पॉप-अप होतो. असं सांगितलं जात आहे की, हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध असणार आहे. हे फीचर यूजर्सना अनोळखी लोकांशी संभाषण सुरू करण्यापूर्वी अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार देणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

लवकरच येणार नवं फीचर

फीचर ट्रॅकर WABetaInfo ने शेअर केलेल्या एका पोस्टनुसार, आयओएस आणि अँड्रॉईडसाठी व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन वॉर्निंग मेसेज फीचर रोलआऊट करण्याचा विचार करत आहे. कंपनीने या नवीन फीचरवर काम देखील सुरु केले आहे. जेव्हा एखाद्या अनोळखी नंबरवरून पाठवलेला मेसेज यूजर्स ओपन करतील, तेव्हा यूजर्सना या अनोळखी नंबरबाबत अलर्ट करण्यासाठी हे नवीन फीचर डिझाईन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप यूजरला कोणत्याही अनोळखी नंबरवरून मेसेज येईल, तेव्हा नवीन फीचर चॅट ओपन करण्यापूर्वीच स्क्रीनवर एक वॉर्निंग मेसेज दाखवणार आहे.

WhatsApp now pauses before you message unknown numbers! WhatsApp users on Android and iOS can now see a warning even before they open a chat with a stranger.https://t.co/V1PDNRkE6Q pic.twitter.com/XJGhubmDWm — WABetaInfo (@WABetaInfo) June 24, 2026

WABetaInfo ने शेअर केला स्क्रीनशॉट

पोस्टमध्ये एक स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे. यावरून असं समजतं की, वॉर्निंग मेसेजमध्ये त्याच देशाचे नाव दिसणार आहे, जिथे फोन नंबर रजिस्टर्ड आहे. यावरून हे देखील समजते की तो क्रमांक ‘कॉन्टॅक्ट’ म्हणून सेव्ह केला आहे का आणि यूजर व मेसेज पाठवणारी व्यक्ती यांच्यात काही कॉमन ग्रुप आहेत की नाही. या अलर्टमध्ये एक मेसेज असणार आहे, ज्यामध्ये लिहीले असेल की, स्कॅमर्स तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि पासवर्ड देण्यासाठी दिशाभूल करू शकतात किंवा तुमच्याकडून पैशांची मागणी करू शकतात. सावध राहा.

Free Fire MAX: 9 व्या ॲनिव्हर्सरीनिमित्त प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! नव्या ईव्हेंटमध्ये मिळणार गोल्ड व्हॉल्ट वाऊचर आणि बरंच काही

यूजर्स घेणार निर्णय

वॉर्निंग मेसेजनंतर यूजर्स चॅट्स सुरु ठेऊ शकतात किंवा बंद करू शकतात. हे पूर्णपणे यूजरच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. यूजरने घेतलेल्या निर्णयानंतर पुन्हा कोणतीही सूचना दिली जाणार नाही. व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर प्लॅटफॉर्मला अनोळखी सोर्सकडून येणारे स्पॅम, फसवणुकीचे प्रकार किंवा बनावट संदेश रोखण्यास मदत करू शकते.

Web Title: Whatsapp is planning to roll out new warning message feature read how it will work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.