नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज... 'या' दिवशी सुरू होणार विक्री
यूएसमध्ये कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 349.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे 30,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. 14 जुलैपासून या डिव्हाईसची विक्री सुरु होणार आहे. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू, लाइट ग्रीन आणि लाइट पिंक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. तसेच भारतात या स्मार्टफोनची विक्री 3 जुलैपासून सुरु होणार आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोनची भारतातील किंमत जाहीर केली नाही. (फोटो सौजन्य – Samsung)
कंपनीने लाँच केलेल्या नव्या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 16 वर आधारित वन यूआय 8.5 मिळणार आहे. या स्मार्टफोनला त्याच्या सुरुवातीच्या जागतिक लाँच तारखेपासून अँड्रॉइड ओएस आणि वन यूआयच्या सहा पिढ्यांचे अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील याची पुष्टी झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटवाला 6.7-इंच फुलएचडी+ सुपर अमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले दिला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए 27 5G मध्ये 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेला स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेट दिला आहे. या चिपसेटसोबतच डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. माइक्रोएसडी कार्डचा वापर करून स्मार्टफोनचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये ओआयएससह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर, 5-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो लेंस समाविष्ट आहे. या डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
ए सिरीजमधील मागील फोन्सप्रमाणेच, सॅमसंग गॅलेक्सी ए 27 5G मध्ये सॅमसंग नॉक्स वॉल्ट सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षण देण्यासाठी IP64 रेटिंग दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए 27 5G मध्ये अनेक एआय फीचर्सचा देखील समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये सर्कल टू सर्च, ऑब्जेक्ट इरेजर आणि व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन समाविष्ट आहे. यात गूगल जेमिनी, पर्प्लेक्सिटी आणि बिक्सबी यांसारख्या एआय असिस्टंट्सना सपोर्ट आहे.






